आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरच्या व्यावसायिकाला पुण्यात गंडा:14 किलो चांदीचे दागिने घेऊन भामटे पसार; गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूर येथे चांदी विक्रीचा व्यवसाय असलेला एका व्यवसायिक पुण्यात मालाची ऑर्डर घेऊन आला असताना, त्याच्याकडून आठ किलाे वजनाचे चांदीचे घुंगरु आणि सहा किलाे वजनाचे पैजण असे एकूण चार लाख रुपये किंमतीचे 14 किलाे वजनाचे दागिने घेऊन भामटयांनी पळ काढला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात जगदीश चाैधरी नावाचा इसम व त्याचा अनाेळखी मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

याप्रकरणी इमरान ऊर्फ मुन्ना महंमद शेख (वय-40,रा.काेल्हापूर) यांनी आराेपी विराेधात उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदरची घटना 19 डिसेंबर राेजी दुपारी 12 ते दीड वाजण्याचे दरम्यान शिवणेतील साहिल रेसीडन्सी, पहिला माळा येथे घडली आहे.

तक्रारदार इमरान शेख यांचा काेल्हापूर येथे चांदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना आराेपी जगदीश चाैधरी याने फाेन करुन 25 किलाे चांदीचे पैंजण व घुंगरुची ऑर्डर दिली हाेती. त्यामुळे तयार असलेले आठ किलाे वजनाचे घुंगरु आणि सहा किलाे वजनाचे पैंजण असा 14 किलाे चांदीचा माल घेऊन ते काेल्हापूर येथून पुण्यातील शिवणे परिसरात आले हाेते.

सदर माल घेऊन ते आराेपींचे घरी गेले असता, आराेपींनी संगनमत करुन सदर माल घेऊन व्यवहाराचे पैसे न देता आर्थिक फसवणुक करत पळून गेले आहे. पोलिस सदर आराेपीचा शाेध घेत असून याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस लुगडे करत आहे.

महिलेने गमावले साेन्याचे दागिने

शिवाजीनगर परिसरातील मॅाडेल कॉलनी येथे सत्यम काे ऑप साेसायटी जवळ 20 डिसेंबर राेजी यमुना सुरेश चव्हाण (वय-67) या पायी रस्त्यावरुन किराणा दुकानात जात हाेत्या. त्यावेळी अज्ञात दाेन अनाेळखी इसमांनी त्यांना थांबवुन ‘आमच्या साहेबांना मुलगा झाला असून साहेब वयस्कर गरीब महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची माेफत साेडी वाटत आहे असे सांगत बाेलण्यात गुंतवले. त्यानंतर तुम्ही गरीब दिसण्यासाठी तुमच्याकडील दागिने पिशवीत टाका असे सांगुन ज्येष्ठ महिलेकडील 87 हजार रुपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने आराेपींनी त्यांचेकडील पिशवीत टाकुन नंतर महिलेस रिकामी पिशवी देऊन माेटारसायकलवरुन निघून जात फसवणुक केली आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात दाेन अज्ञात आराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...