आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचा केला पाठलाग:पुण्यातील हर्डीकर हॉस्पिटलमधील विनयभंग प्रकरणी पोलिसांनी वॉर्डबॉयला बेड्या

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलाच्या हाताच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या महिलेला अंघोळ करताना पाहणाऱ्या व नंतर तिचा पाठलाग करणाऱ्या गणेशखिंड रोडवरील हर्डीकर हॉस्पिटलमधील वॉडबॉयवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी त्याला मंगळवारी रात्री बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत एका 42 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वॉर्डबॉय आयाज शेख (25, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, खडकी) याला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीने मुलाच्या हाताचे ऑपरेशन करण्यासाठी प्रायव्हेट रूम घेतली होती. त्या रूममधील बाथरूमध्ये अंघोळीसाठी गेल्या असता हॉस्पिटलमध्ये काम करणारा आयाज त्या ठिकाणी बेडशीट बदलण्यासाठी आला. बेडशिट बदलून झाल्यानंतर शेजारच्या रूमच्या जाळीतून महिलेला अंघोळ करताना पाहिले. नंतर तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याबाबत फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार 4 जून रोजी 1 वाजण्याच्या सुमारास घडला होता. दरम्यान या गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटिव्हीच्या आधारे व मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना चकवा देत होता.

मगंळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिस हवालदार बशीर सय्यद आणि अविनाश भिवरे यांना आरोपी हा मनपा बसस्टॉप येथे आला असता त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने, गुन्हे निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, उपनिरीक्षक अतुल क्षिरसागर, अंमलदार राहुल होळकर यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...