आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालमजुरीविरोधात मोहीम:जनजागृतीसाठी 14 वर्षीय मुलाची एकाच दिवशी तैलबैला, नागफणी सुळक्यावर चढाई

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून १४ वर्षाच्या युवराज जाधव या मुलाने पुण्यातील एस. एल. एडवेंचर स्पोर्ट्सच्या सहाय्याने लोणावळ्यातील कठिण श्रेणीतील तैलबैला व नागफणी असे दोन सुळके लिड क्लाइंबिंग करून यशस्वीपणे रविवारी सर केले.

वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी एका पाठोपाठ एकाच दिवशी सह्याद्रीतील हे दोन अवघड सुळके सर करण्याचा विक्रम करणारा हा कदाचित पहिलाच बालक असेल, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. तैलबैला येथील अवघड समजली जाणारी उजवी कातळभिंत समुद्रसपाटीपासून उंची (३३२२ फूट) तर जमिनीपासून (२५० फूट) तसेच नागफणी म्हणजेच सुळका समुद्रसपाटीपासून (३००० फूट) तर जमिनीपासून (३०० फूट) उंच आहे. युवराज जाधव हा राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल येथे अमोल जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली स्पोर्ट्स क्लाइंबिंग या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. एस.एल. एडवेंचरचे प्रमुख लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहीमेची आखणी झाली होती. ही मोहीम आखण्याचा मूळ उद्देश " बालमजुरी हटवूया, खंबीर भारत घडवूया " हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा होता आणि युवराजने हे दोन सुळके सर करून हा संदेश दिला. व्यसनाधीनता, कुपोषण,बाल गुन्हेगारी, भ्रष्टाचार या सगळ्यांची साखळी तोडण्यासाठी आपण एकत्र येवून काम करूया हा संदेश युवराजने दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...