आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 42 हजार किलो अमली पदार्थ नष्ट:आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त केंद्रीय यंत्रणांनी राबवली मोहीम

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात विविध कारवायांत जप्त केलेले जवळपास ४२ हजार किलो अमली पदार्थ, १७ लाख १० हजार ८४५ नशेच्या गोळ्या, ७२ हजार कफ सिरपच्या बाटल्या तसेच १६ हजार इंजेक्शनच्या कुपी महसूल गुप्तचर संचालनालय, केंद्रीय अप्रत्यक्ष कर विभाग आणि सीमाशुल्क मंडळाच्या अधिका-यांनी बुधवारी नष्ट केल्या. आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाअंतर्गत ही मोहिम राबविण्यात आली.

पुणे तसेच विभागात अमली पदार्थ तस्करांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमली पदार्थांचा दुरुपयोग आणि तस्करांना संदेश देण्याच्या हेतूने जप्त करण्यात आलेल्या या पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बाबत आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

पुणे प्रादेशिक युनिटने जप्त केलेल्या २ हजार ४३९ किलो ड्रग्जची या पूर्वीच विल्हेवाट लावण्यात आली होती. सर्व जप्त मुद्देमाल मेसर्स महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, एमआयडीसी, रांजणगाव परिसरातील भस्मीकरण कारखान्यात नष्ट करण्यात आला. या वेळी मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या डॉ. मुक्ता पुणतांबेकर, डॉ. सोनाली काळे या उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...