आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:मास्क घालून तोतया उमेदवारांनी दिली पोलिस शिपाई भरती परीक्षा; 7 अटकेत

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच लाखांची बोली, 5 भामटे औरंगाबादचे, जालना-वाशीमचा प्रत्येकी 1

पुण्यातील पोलिस भरती परीक्षेवेळी तीन तोतया विद्यार्थी परीक्षा देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण सात भामट्यांना अटक केली असून यापैकी ५ औरंगाबाद जिल्ह्याचे, तर एक जालना आणि एक वाशीम जिल्ह्याचा रहिवासी आहे. पाच लाख रुपयांच्या बोलीवर विविध परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसवण्याचा गोरखधंदा ही टोळी करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सन २०१९ च्या पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षेत मूळ परीक्षार्थीच्या जागी डमी उमेदवाराचे हॉलतिकीट, पॅन कार्ड, आधार कार्ड बनवले आणि कोविड परिस्थितीचा फायदा उठवत मास्क घालून परीक्षा दिली. याप्रकरणी बाबासाहेब भीमराव गवळी (२२), सूरज केसरसिंग भोपळावत (२७) रामेश्वर अप्पासाहेब गवळी , विठ्ठल किसन जारवाल जनक सिसोदे ( सर्व जिल्हा औरंगाबाद), महेश सुधाकर दांडगे (जालना) आणि शामराव विश्वनाथ भोंडणे (वाशीम) यांना अटक केली. परीक्षेनंतर आरोपींना एक लाख रुपये, तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ४ लाख रुपये असे एकूण ५ लाख प्रत्येक उमेदवारामागे देण्याचे ठरले होते, असे पुण्याचे सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...