आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळूमामांच्या मेंढरांचे दर्शन घेऊन पुण्याकडे परत निघालेल्या भाविकांच्या कारने रस्त्याकडेला थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात कारमधील महिलेसह दहा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला. तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले. सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथे बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मृत आणि जखमी हे पुणे आणि अकोला येथील रहिवासी आहेत.
दर्शनाहून येत होते पुण्यात
सातार्यातून बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घेऊन पुण्यातील भाविक नातेवाईकांसोबत कारने पुण्याकडे निघाले होते. खंडाळा हद्दीत महामार्गाकडेला उभ्या असणार्या मालट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात महिलेसह दहा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले.
यांचा मृत्यू
कांचन चंद्रकांत वनशिवे, विरेंद्र चंद्रकांत वनशिवे (रा. वडगाव रासाई, ता.शिरुर, जि. पुणे), अशी मृतांची नावे आहेत.
हे गंभीर जखमी
संकेत भिमाजी चौधरी (रा. वडगाव रासाई, ता.शिरुर जि. पुणे), स्नेहल पांडुरंग कुलते, अनिल मुक्ताराम कुलते, अंजली अनिल कुलते, परी अनिल कुलते (सर्व रा. अकोला) हे गंभीररित्या जखमी झाले.
सोबत होते अकोल्यातील नातेवाईक
पुणे जिल्ह्यातील वडगाव रासाई (ता. शिरुर) येथील वनशिवे कुटुंबीय अकोल्यातील आपल्या नातेवाईकांसोबत सातारा जिल्ह्यामध्ये असणारया बाळूमामांच्या दर्शनासाठी कारमधून (क्र.एम. एच.13 एन. 3154) आले होते. दर्शन घेऊन पुण्याला परत जाताना खंडाळा हद्दीत एका हॉटेलसमोर उभ्या असणार्या ट्रकला पाठीमागून भरधाव कारने धडक दिली.
क्रेनद्वारे काढला ट्रकमध्ये अडकलेला कारचा भाग
धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. ट्रकमध्ये अडकलेला कारचा भाग क्रेनच्या मदतीन बाजूला करावा लागला. त्यानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढता आले. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.