आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर विक्रेत्याची 5 कोटींची फसवणूक:बारामती न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीयकृत बँकेच्या 9 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीयकृत बँकेच्या विविध पदांवरील पदाधिकाऱ्यांनी संगनमत करुन लोणी काळभोर येथील एका ट्रॅक्टर वितरकाची सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीयकृत बँकेच्या 9 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोहर बबनराव खैरे (वय 42, मुळ रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली. सध्या भिगवण बारामती रोड, जळोची, बारामती) यांनी बारामती न्यायालयात अर्ज दाखल केला होता. फौजदारी प्रक्रिया संहितेन्वये गुन्हा दाखल करुन तपास करण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानुसार बारामती पोलीसांनी यु. एम. बाजी, अवनीश कुमार, जयकिसन रोडा, चूक साहेब (चौघे रा. एरंडवणे,पुणे), नागेश्वर राव, संदीप माळी, विरेंद्र रावखंडे, अजय गुप्ता (चौघे रा. गुलटेकडी, पुणे) व वैभव पाटील (थेऊर शाखा व्यवस्थापक) या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कदमवाकवस्ती येथील सुर्या ट्रॅक्टर कंपनीने ऑगस्ट 2015 मध्ये थेऊर फाटा येथील बडोदा बँकेतून कर्ज काढले होते. त्यामध्ये फिर्यादी मनोहर खैरे हे फक्त दोन कोटी रूपये कर्जाला जामीनदार आहेत. आणि 5 कोटी रुपये ही बँक गॅरंटी आहे. बडोदा बँकेच्या अधिकाऱ्यांनी फिर्यादीच्या विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या. त्यापैकी काही कागदपत्रे ही कोरी होती.

बँकेच्या आदीकऱ्यांनी त्यावेळी फिर्यादीला सांगितलं की, बँकेने 12 कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहे. कंपोझीट हायपोथेकेशन करारामध्ये कर्ज हे 7 कोटी रूपयांचे आहे. दोन कोटी रुपये कर्ज समजून फिर्यादीने सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. नंतर सर्व कागदपत्रे पाहिल्यावर बँक ऑफ बडोदाने खोटेपणा करून पाच कोटी रुपयांची बँक गॅरंटी कर्जाला जोडली. मात्र, फिर्यादीने पाच कोटी रुपयांच्या बँक गॅरंटीला कधीही हमी दिली नव्हती.

बँक ऑफ बडोदाने सुर्या ट्रक्टर्स कंपनीला फक्त 2 कोटी रुपये कर्ज दिले होते. नंतर बँकेने पाच कोटी रुपयांच्या बँक गॅरंटीतील 4 कोटी 10 लाख रुपये न्यू हाॅलंड ट्रॅक्टर कंपनीला वर्ग केले. बँकेने सीएनएच इंडस्ट्रीयल इंडिया प्रा लि यांना पत्र पाठवून ही रक्कम परत पाठवण्याचे निर्देश दिले. परंतू त्या कंपनीने पैसे परत केले नाहीत.

आता कर्ज परतफेड करण्यासाठी फिर्यादीकडे बेकायदेशीर आणि फसवणूकीने पैसे मागितले जात आहेत. प्रत्यक्षात बँकेने सुर्या ट्रॅक्टर्स कंपनीस केवळ 2 कोटी रुपये कर्ज दिले असताना 7 कोटी कर्ज व त्यावरील व्याज असे एकूण 18 कोटी रुपयांची मागणी बँक फिर्यादीकडे करत आहे. ज्या बँक गॅरंटीस फिर्यादी जामिनदार नव्हते, त्या रकमेची बँक मागणी करत आहे. त्यामुळे फिर्यादीने बारामती न्यायालयात तक्रार दाखल केला होता. बारामती पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक एन घोडके करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...