आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी मंत्र्यांवर गुन्हा दाखल:भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांविरूद्ध अपहरण, खंडणी आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्यावर दाखल केलेला गुन्हा राजकीय षडयंत्रात भाग, यामागे कोण आहे हे सर्वांना माहीत : गिरीश महाजन

पुण्याचे कोथरूड भागात भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांवर अपहरण, खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर जळगाव स्थित मराठा विद्या प्रकाशक सहकारी समाज संस्थेच्या संचालकांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. अपहरणानंतर त्याला राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे.

सहायक पोलिस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांनी सांगितले की, "विजय पाटील (52) यांनी माजी मंत्री गिरीश महाजन, तानाजी भोइट, निलेश भोइट आणि विरेंद्र भोले यांच्यासह 29 लोकांविरोधात तक्रार दिली होती. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर मंगळवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी 2018 ची आहे. तक्रारकर्ते विजय पाटील यांनी आपल्या जबाबात म्हटले की, तो आरोपींना घाबरत होता, त्यामुळे इतक्या दिवसांनंतर गुन्हा दाखल केला."

बहाण्याने पुण्यात बोलावून एका फ्लॅटमध्ये बंदी केले

पोलिसांनुसार, विजय पाटील हे पेशाने वकील असून, जळगाव येथील मराठा विद्या प्रकाशक सहकारी संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारीनुसार, जानेवारी 2018 मध्ये कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने त्यांना पुण्याला बोलावले. यानंतर येथील सदाशिव पेठेतील एका फ्लॅटमध्ये नेऊन मारहाण केली आणि बंद केले. तसेच चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून रोख 5 लाख रूपये वसूल केले असून संचालकपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांच्या खिशातील रोख रोकड व सोन्याचे दागिनेही लुटल्याचे पाटील म्हणाले.

हे राजकीय षड्यंत्र : गिरीश महाजन

भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले आहेत की पुण्यात त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले खंडणी प्रकरण हा राजकीय षड्यंत्रात भाग आहे आणि त्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे हे सर्वांना माहित आहे. या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण ब्युरो चौकशी करण्यासाठी महाजन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ते म्हणाले, 'हा गुन्हा कोठे झाला? केव्हा झाला?, त्यावेळी मारहाण करणारे लोक कुठे होते? त्यांचे फोन ट्रॅक करावे जेणेकरून सत्य समोर येईल.

बातम्या आणखी आहेत...