आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा:काँग्रेस नेत्या सोनिया गांधींवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल पुणे पोलिसांची कारवाई

पुणे/मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांदिवलीचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल पुण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्यावर हे आक्षेपार्ह ट्विट केले होते. या विरोधात पुण्यातील सायबर पोलिस स्टेशनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार आमदार अतुल भातखळकर यांच्यावर पुणे सायबर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

नेमके काय ट्विट केले होते?

नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची जुलै महिन्यात ईडीने चौकशी केली होती. त्यापूर्वी ईडीने सोनिया गांधींना समन्स पाठवले होते. मात्र, त्याचदरम्यान कोरोना संसर्ग झाल्यामुळे सोनिया गांधींनी चौकशीस हजर राहण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यावरूनच भातखळकर यांनी सोनिया गांधींवर टीका करत ट्विट केले होते. ‘कोरोनाचा ईडी व्हेरीयंट’ असे ट्विट भातखळकर यांनी केले होते.

या ट्विटवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. अखेर त्यावरून भातखळकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...