आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागणी:जातीनिहाय जनगणनेने जातीयता वाढणार नाही, रामदास आठवले यांचे मत

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2021 ची जनगणना ही जातीनिहाय केल्यास प्रत्येक जातीची संख्या निश्चित मिळेल

मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात टाकून वाद निर्माण करण्यापेक्षा त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे ही मराठा समाजाची मागणी आहे. ओबीसींना आधीच आरक्षण कमी मिळालेले आहे, त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे. परंतु कायदा केवळ मराठा समाजापुरता करता येणार नाही. आरक्षण देताना देशभरातील क्षत्रिय लाेकांना आरक्षण देण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक मागासांना १०% आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. २०२१ ची जनगणना ही जातीनिहाय केल्यास प्रत्येक जातीची संख्या निश्चित मिळेल. जातीनिहाय जनगणना झाल्याने जातीयता वाढणार नाही असेे मत सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवड येथ व्यक्त केले.