आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 2 फ्लॅट फोडणाऱ्या चोरट्याला 12 तासांत बेड्या:सीसीटीव्हीमुळे आला जाळ्यात; 15 लाखांचा ऐवज केला होता लंपास

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकाच इमारतीमधील 2 फ्लॅट फोडून पार्किंगमधील कार चोरून नेणाऱ्या चोरट्याला खडकी पोलिसांनी केवळ 12 तासाच्या आत अटक केली.

सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी त्याची ओळख पटून त्याला पकडले. रामजित सिंग टाक (वय 19, रा. गाडीतळ हडपसर,पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे.

घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बोपोडी भागात राहण्यास आहेत. त्यांचा बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्याने 30 हजारांचा ऐवज चोरला होता. तर, त्यांच्या शेजारील बंद फ्लॅट देखील फोडून 6 हजारांची रोकड व पार्किंगमधील कार असा 15 लाखांचा ऐवज चोरून नेला होता. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर खडकी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही पडताळले. त्यात चोरटा कैद झाला होता. त्याची माहिती काढली जात असताना तो गाडीतळ येथील रामजित असल्याचे समजले.

एटीएम मशीन फोडले

पुण्यातील उरूळी कांचन येथील एचडीएफसी बँकचे एटीएमचा दरवाजा तोडून एटीएम मशीनचे डिजीटल लॉक तोडून चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कृष्णा काशिनाथ गोळे (60, रा. साईनगर, कोंढवापुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुरूवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...