आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेगवेगळ्या दुकानांना लागणाऱ्या सीसीटीव्हीसाठीच्या साहित्याची ऑर्डर कर्मचाऱ्याने घेतली. त्यानंतर मालकाच्या दुकानातून मालाचा पुरवठा केला व आलेली रक्कम मालकाच्या बॅंक खात्यात जमा न करता त्या रकमेचा कर्मचाऱ्याने अपहार केला व मालकाला साडेसात लाख रुपयांचा गंडा घातला. हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संशयितांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्तिक प्रभात नावजिया (वय -36, रा. पुणे) यांनी संशयित आरोपी अमर इस्माईल शेख (व. ३६, रा. कासरवाडी ,पुणे ) याच्या विरुद्ध खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. फसवणुकीचा प्रकार 26 /11 /2019 ते 26 /2 /2022 यादरम्यान घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अमर शेख याने तक्रारदार कार्तिक नवजीया यांच्या भवानी पेठेतील ब्ल्यू पॉईंट पाॅवर लाईन्स या दुकानातून स्टार डिस्ट्रीब्युटर्स बारामती, रतन राज कॉम्प्युटर घोरपडी पेठ पुणे, आणि सिलिकॉन सिस्टीम सदाशिव पेठ, युनिक एंटरप्राइजेस हांडेवाडी यांच्या नावावर वेळोवेळी सात लाख ५० हजार रुपये किमतीच्या सीसीटीव्हीसाठी लागणाऱ्या साहित्याची ऑर्डर घेतली.
त्याप्रमाणे त्यांना मालाचा पुरवठा करून त्या ऑर्डरच्या बदल्यात संबंधित दुकानदारांकडून साडेसात लाख रुपये घेऊन ते तक्रारदार यांच्या दुकानाच्या बँक खात्यावर न भरता, संबंधित रकमेचा आरोपीने अपहार केला आहे. याप्रकरणी खडक पोलीस पुढील तपास करत आहे.
स्नॅपचॅटचे खाते हॅक करून तरुणीचा विनयभंग
लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय तरुणीने इंस्टाग्राम खात्यावरून ॲमेझॉन डील्स फॉर यू या नावाच्या पेजवर क्लिक केले. त्यावरून जुना फोन खरेदी करण्याकरीता तिने विनंती केली असता, समोरील व्यक्तीने त्याचे दोन यूपीआय आयडी पाठवून तरुणीस एक हजार रुपये असे पंधरा वेळा सुमारे १५ हजार रुपये संबंधित खात्यावर पाठवण्यास लावले.
त्यानंतर आरोपीने तरुणीस त्यांचे पार्सल न पाठवता, तिच्याशी वाद घालून तिच्या स्नॅपचॅटचे खाते हॅक करून ' तू माझ्याशी बोलत जा, मी सांगेन तसेच करशील तर मी तुझा व्हिडिओ व्हायरल करणार नाही' असे बोलून तरुणीस वेळोवेळी फोन करून अश्लील व्हिडिओ पाठवून त्रास दिला आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.