आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आळंद:आळंदमध्ये रमजान ईद उत्साही वातावरणात साजरी

आळंद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या सावटाखाली गेली दोन वर्षे स्थगित झालेली रमजान ईद या वेळी मुस्लिम बांधवांनी उत्साही वातावरणात साजरी केली. आळंद शहराबाहेरील ईदगाह मैदानावर या वेळी सामूहिक नमाजाला जागा अपुरी पडल्याचे दिसून आले. असंख्य मुस्लिम बांधवांनी अनेक मशिदींमध्येही ईदची नमाज अदा केल्याचे सांगण्यात आले.

नमाजनंतर परस्परांना व असंख्य हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. अनेक मुस्लिम बांधवांनी आपल्या घरी हिंदू समाजातील मित्रमंडळींना शिरखुर्मा पिण्यासाठी आमंत्रित केले होते.

बातम्या आणखी आहेत...