आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:लाॅकडाऊन मध्ये सेलिब्रेटींना मिळाला फॅनशी जाेडणारा नवा व्यवसाय, गाेनटस या स्टार्टअपच्या माध्यमातून चाहत्यांना अनोखी भेट

पुणे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गाेनटस स्टार्टअपच्या माध्यमातून कलाकारांच्या माध्यमातून चाहत्यांना अनाेखी भेट

काेराेना विषाणूचे प्रार्दुभावामुळे सर्व दैंनिदन व्यवहार दाेन महिन्यापेक्षा अधिकाकळ ठप्प झाले असून अशावेळी बाॅलीवूडचे कलाकारांना ही घरात बंदिस्त रहावे लागल्याने त्यांना ही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, मुंबईतील गाेनटस या स्टार्टअपच्या माध्यमातून सेलिब्रेटिंना घरबसल्या चाहत्यांशी जाेडणारा एका नवा व्यवसाय मिळाला आहे. चाहत्यांचे वाढदिवस, लग्नाचे शुभेच्छा, आवडत्या व्यक्तींना अभिनेत्यांकडून निराेप, आवडते कलाकारांकडून आपले आवडते गाणे, नृत्य करुन घेण्याची संधी याद्वारे उपलब्ध झाल्याने कलाकार आणि चाहते यांचे नाते यापुढील काळात आणखी दृढ हाेऊ शकणार आहे. 

विनम्र पांडिया, मयांक गुप्ता आणि जाेजी जाॅर्ज या तिघांनी एकत्र येत ही नवीन कल्पना प्रत्यक्षात साकारण्यास सुरुवात केली आहे. एका मित्राचे मुलाचे वाढदिवसाचे पार्टीत गेले असताना, त्याठिकाणी संबंधित मुलास त्याचे आवडते व्यक्तिचित्र डाॅरेमन कार्टुनकडून शुभेच्छा दिल्या जात हाेते आणि त्याकरिता संबंधित कलाकारास पैसे ही देण्यात आले. ही बाब हेरुन अशाप्रकारे वेगवेगळया क्षेत्रातील सेलिब्रेटी आणि त्यांचे चाहते यांना जाेडता येऊ शकेल ही कल्पना आली आणि तिच्यावर काम करण्यात आले. सेलिब्रेटी आणि त्यांचे लक्ष्यावधी चाहते यात नेहमी अंतर असते आणि दूर करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला. जे सेलिब्रेटी आपणास आवडतात त्यांचेकडून अल्पावधीचा एक संदेशाचा  व्हिडिआे वेबसार्इट अथवा माेबार्इलवर तयार करुन दाेघात भावनिक नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याकरिता एक हजार रुपयांपासून 30 हजार रुपयांपर्यत दर आकारला जात आहे. हे संदेश वाढदिवस किंवा लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छांपासून ते सणाचे शुभेच्छा किंवा अन्य इतर विविध समारंभासाठी यावर अवलंबून असताता. छाेटया व मध्यम उद्याेगांना ही सदर व्यासपीठ वापरुन आपल्या कर्मचाऱ्यांना प्राेत्साहित करण्यासाठी हा मार्ग अवलंबता येऊ शकताे. चित्रपट, सिरिअल, संगीत, क्रिडा, काॅमेडी, फुड शेफ आदी वेगवेगळे क्षेत्रातील 200 पेक्षा जास्त सेलिब्रेटी या व्यासपीठावर चाहत्यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामुळे चाहत्यांना विविध क्षेत्रातील सेलिब्रेटींशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. कैलाश खेर, शंकर महादेवन, शान, शिवमणी, अनुप जलाेटा, जाॅण्टी ऱ्हाेडस, फाेगट भगिनी, शिबानी कश्यप, सलीम मर्चंट, गाेरव बिदुरी, लान्स क्लुसनर, शिविन नारंग, अंकिता बाठला असे विविध क्षेत्रातील दिग्गज यामाध्यमातून काम करणार आहे. 

सर्व भाषेतील कलाकार जाेडणार

गाेनटसचे संस्थापक विनम्र पांडिया म्हणाले, सेलिब्रेटी व चाहते यांना सर्वाधिक जवळ आणणारा देशातील प्रभावी प्लॅटफाॅर्म याद्वारे निर्माण झाला आहे. चाहत्यांना त्यांचे आवडते सेलिब्रटीकडून एखादा संदेश मिळावा अशी मनाेमन इच्छा असते ती आयुष्यभरासाठी आठवण देणारी संदेश यंत्रणा याद्वारे मिळू शकेल. देशातील माेठया शहरांपेक्षा ग्रामीण भाग व छाेटे शहरात सेलिब्रेटींची माेठी क्रेझ असल्याचे दिसून येते आणि त्यादृष्टीने हे व्यासपीठ महत्वपूर्ण ठरु शकेल. देशातील विविध भाषेतील कलाकार आणि सेलिब्रेटी या व्यासपीठावर जाेडले जाणार असून किमान एक हजार सेलिब्रेटी जाेडण्याचे आमचे लक्ष्य आहे. लाॅकडाऊन मध्ये कलाकार घरीच असल्याने त्यांना या व्यासपीठाच्या माध्यमातून फायदा झाला असून इतरवेळी ही ते चाहत्यांचे इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळ काढतील. सध्या लग्न साधेपणाने साजरे केली जात असून अशावेळी सेलिब्रेटी व्हिडिआे संदेशाच्या माध्यमातून नव दांम्पत्याला अनाेखी भेट देऊ शकतील.सेलिब्रेटींचा  डिजीटल परफाॅर्मनस ही अशाप्रकारे मनाेरंजन क्षेत्रात निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

आमच्याकरिता अनाेखा अनुभव

प्रसिध्द संगीतकार शंकर महादेवन याबाबत म्हणाले, माझ्या चाहत्यांपर्यंत एका अनाेख्या पध्दतीने पाेहचण्यासाठी गाेनटसच्या माद्यमातून नवीन पर्याय निर्माण झाला आहे. या प्लॅटफाॅर्मच्या द्वारे मला माझ्या चाहत्यांची स्वप्ने पूर्ण करता येऊ शकणार आहे. चाहते कलाकारांवर प्रचंड प्रेम करत असतात तितकेच प्रेम त्यांना सेलिब्रेटींकडून मिळण्यासाठी एका मार्ग तयार झाला आहे. या अनाेखा उपक्रमातून चाहत्यांना आयुष्यभरासाठी संस्मरणीय अनुभव देण्यासाठी आम्ही तयार असून कलाकार व चाहते यांचे नाते अधिक दृढ हाेऊ शकेल. 

बातम्या आणखी आहेत...