आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मोबाइल चोरट्यांचा सुळसुळाट:कर्नाटकामधून पुण्यात आलेली मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद; आरोपींना 2 दिवसाची पोलिस कोठडी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात एकीकडे मोबाईल चोरीच्या घटना वाढत असताना सिंहगड पोलिसांनी मोठी कारवाई करत चोर्‍या करणार्‍या आंतरराज्यीय कर्नाटक येथील टोळीला जेरबंद केले. याप्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीचे तब्बल 84 मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

शरथ मंजुनाथ (21), केशवा लिंगराजु (24) आणि नवीन हनुमानथाप्पा (19, तिघेही रा. हनुमंतनगर, हौसमाने मारीअम्मा मंदीराजवळ, शिमोगा कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत किशोर राम कोलारकर (62, रा. नवले ब्रीज जवळ) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिघांनाही न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाईल चोरी करून केला पोबारा

फिर्यादी कोलारकर दि. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास हिंगणे खुर्द येथील जगताप हॉस्पीटल समोर भाजीपाला खरेदी करत असताना तिघांनी त्यांच्या खिशातील मोबाईल चोरी करून पोबारा केला होता. त्यानंतर कोलारकर यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.

हद्दीत घडणार्‍या मोबाईल, जबरी चोरीच्या अनुषंगाने सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे पथक वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या सुचनेनुसार सिंहगडरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पथकातील अमंलदार देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर यांना मोबाईल चोरटे हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फनटाईम थिअटरच्या परिसरात थांबले असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार तपास पथकातील कर्मचार्‍यांनी यावेळी तिघांना त्यांच्याकडे असलेल्या दोन बॅगेसह ताब्यात घेतले.

84 मोबाईल केले जप्त

एका बॅगेत 41 दुसर्‍या बॅगेत 42 तर त्यातील एका चोरट्याजवळी एक असा असे तब्बल 15 लाख 25 हजारांचे महागडे 84 चोरीचे मोबाईल फोन पथकाने जप्त केले. त्यांना ताब्यात घेऊन अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील गिरीश बारगाजे यांनी तिघांच्याही पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली. सहायक पोलिस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांच्या मागर्दशनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम, सहायक पोलिस फौजदार आबा उत्तेकर, हवालदार संजय शिंदे, अंमलदार शंकर कुंभार, अमित बोडरे, देवा चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...