आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:कोरोना लढाईत केंद्राची थेट मदत हवी, सल्ले नको : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'जनतेला पोकळ सल्ले देऊन काम भागणार नाही'

कोरोना विरोधातील लढाई दीर्घकालीन चालणारी असून, अर्थचक्राचा वेग मंदावणारी आहे. त्यासाठी व्यक्तिगत प्रतिकार शक्ती, शारीरिक पथ्याबरोबरच सामाजातील “अर्थकारणाची पोकळी”भरून काढण्यासाठी सरकारने कृती केली पाहिजे. त्यासाठी तातडीने रोजंदारीवर पोट असणाऱ्यांसाठी थेट अर्थ सहाय्य केले पाहिजे. जनतेला पोकळ सल्ले देऊन काम भागणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. 

गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे मनपा हॉस्पिटल्सच्या कोरोना योद्धा डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ यांना प्रतिबंधात्मक साहित्य पीपीई किट्स, एन ९५ मास्क, सेनिटायझेशन बाटल्या, रोग प्रतिकारक व्हिटामिन सी,डी व झिंग गोळ्या चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन राजीव गांधी स्मारक समिती व गोपाळदादा तिवारी मित्र परिवार’ यांच्यातर्फे करण्यात आले होते. या वेळी डाॅ. मंदार नागमोडे, राजीव जगताप, सूर्यकांतजी मारणे, भाऊ शेडगे, रवी मोहिते, राजेंद्र खराडे, प्रसन्न पाटील, जयसिंग भोसले, गौरव बोराडे, योगेश भोकरे, महेश अंबिके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...