आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सरकारला ७० हजार कोटींची गुंतवणूक करावी लागली, अन्यथा या बँका अडचणीत आल्या असत्या. ही बाब माझ्या मनाला अस्वस्थ करणारी आहे. सहकारी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होतात, हा गैरसमज दूर करून केंद्र सरकारने सहकारी बॅंकांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व पद्मविभूषण शरद पवार यांनी व्यक्त केले.
दि विश्वेश्वर सहकारी बँक लि. पुणे च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ प्रसंगी पवार बोलत होते. देशातील सहकारी बँकांची संख्या ही १,५१४ इतकी असून यामध्ये महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे असे सांगत पवार म्हणाले, “ सहकार क्षेत्रातील बॅंकांमध्ये घोटाळे होण्याचे प्रमाण अत्यल्प अर्थात ०.४३ इतके असल्याने याच बॅंकांमध्ये घोटाळे होतात हा समज चुकीचा आहे. महाराष्ट्र राज्याचा देशातील सहकार क्षेत्रातील वाटा मोठा असून वैकुंठ मेहता, धनंजय गाडगीळ, यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांसारख्या दिग्गजांचे यामध्ये मोलाचे योगदान आहे. संकटांच्या काळात सहकारी बँका मदतीसाठी पुढे येतात आणि म्हणूनच त्यांच्याकडे सरकारने सहानुभतीपूर्वक दृष्टीकोनाने पहायला हवे, असेही पवार यांनी नमूद केले. कोणत्याही बँकेची
स्थिती चांगली की वाईट हे समजण्यासाठी त्याचा निव्वळ एनपीए किती हे पहावा. ही त्या बँकेची नाडी परीक्षा म्हणता येईल. दि विश्वेश्वर सहकारी बँकेचा हा निव्वळ एनपीए १.३४ टक्के इतका कमी आहे,असे सांगत पवारांनी बँकेचे कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.