आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार वितरण:केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण देशाचा आत्मा; उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हा देशाचा आत्मा आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते पुण्यात आले असता बोलत होते.

गणेशोत्सव काळात लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरूड मतदारसंघात ‘गणपती रंगवा स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोथरुड मधील अनेक बाल मित्रांनी सहभाग घेतला. यातील उत्कृष्ट बालकलाकारांना शुभारंभ लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यांची होती उपस्थिती

या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात पाटील बोलत होते.यावेळी अभिनेत्री शर्वरी जेमेनिस, भाजपा पदाधिकारी पुनीत जोशी, ॲड. वर्षा डहाळे‌, प्रा.अनुराधा येडके, राज तांबोळी, स्पर्धेचे पर्यवेक्षक रमणबाग शाळेचे सुरेश वरगंटीवार, पत्रकार सचिन जोशी, मूर्तिकार योगेश मालुसरे, व्हिजन शाळेच्या कला शिक्षिका ज्योत्सना कुंटे,वैशाली बोडके, कन्याकुमारी आढाव, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, हर्षाली माथवड, माधुरी सहस्रबुद्धे, वृषाली चौधरी, शिवराम मेंगडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पाटील म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुकुल शिक्षण पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व होते. या पद्धतीमुळे आपल्या मुलांना सर्व कलांचे शिक्षण मिळत होते. मात्र, ब्रिटिशांनी ही शिक्षण पद्धती मोडीत काढली. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर मोदीच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कौशल्याभिमुख शिक्षण देणारी ही शिक्षण पद्धत आणली असून, केंद्र सरकारचे हे नवं शैक्षणिक धोरण देशाचा आत्मा आहे. ज्यामुळे आपल्या मुलांमधील कलागुणांना वाव मिळण्यासह सर्वांगिण विकास होईल. आज आपल्या पुणे शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत. जी आताच्या तरुण पिढीलाही माहिती नाहीत. त्यामुळे आगामी काळात ही सर्व ठिकाणे शोधून त्यांची नवीन पीढिला ओळख व्हावी, या उद्देशाने लहान मुलांसाठी ‘मामाच्या गावाला जाऊ या!’ नावाने छोटी सहल आयोजित केली जाईल. त्याचप्रमाणे आपली नवीन पिढी संस्कारक्षम घडवी या उद्देशाने मातृवर्गासाठी ‘आईच्या गोष्टी’ ही स्पर्धा आयोजित केली जाईल अशी घोषणा ही त्यांनी यावेळी केली.

अभिनेत्री शर्वरी जेमेनिस ​​​​​​यांनी केले वक्यव्य

अभिनेत्री शर्वरी जेमेनिस म्हणाल्या की, श्री गणेश ही विद्येच्या देवतेसह 64 कलांचा अधिपती आहे. प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार दडलेला असतो, आणि ही कलाच त्या माणसाला शेवटपर्यंत साथ देते. त्यामुळे आपल्यातील कला ओळखण्यासाठी एक व्यासपीठ मिळणं अतिशय महत्त्वाचे असते. त्याची प्रतिमा लहान मुलांनी रंगवावी ही अतिशय अभिनव कल्पना आहे.

बातम्या आणखी आहेत...