आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:अकरावी प्रवेशासाठी सीईटी 21 ऑगस्टपर्यंत, सोमवारपासून अर्ज भरणा सुरू

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या निकालानंतर आता अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घेतली जाणार आहे. साधारणपणे २१ ऑगस्टपर्यंत ती आयोजित केली जाईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. सीईटीसाठी सोमवारपासून (१९ जुलै) अर्ज स्वीकारले जातील. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र पोर्टलद्वारे अर्ज उपलब्ध करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक टाकून सीईटी परीक्षेचा अर्ज उघडता येईल. त्यामध्ये दोन प्रश्न विचारले जातील. सीईटीसाठी तुम्ही इच्छुक आहात का आणि इच्छुक नाहीत का?, असे पर्याय विचारले जातील.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी विनाशुल्क असेल. मात्र अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार आहे. सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश दुसऱ्या टप्प्यांत दिले जातील. दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही सीईटी ऑॅफलाइन घेतली जाणार आहे.