आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:पुणे रेल्वे स्थानकात सोनसाखळी चोरी करणारे चोरटे जेरबंद, चार गुन्हे उघडकीस

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे लोहमार्ग पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेऊन, चौकशी करत अटक केली आहे. सदर चोरट्यांनी सोनसाखळी चोरीचे केलेले चार गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांनी दिली आहे.

मोतीलाल रेडी आप्पा पवार (वय- 21वर्ष ,रा. बाणेर पुणे), देवराज उर्फ कृष्णा शंकर पवार (वय- 22 वर्ष, रा. विकासनगर देहूरोड ,पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन लाख 55 हजार 460 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे लोहमार्ग पोलीस ठाणेचे डी बी पथक व आरपीएफ ,पुणे हे प्लॅटफॉर्मवर गस्त करीत असताना, पोलिसांना बातमीदारामार्फत आरोपींची माहिती मिळाली होती.

या आरोपींनी पुणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर पाच व सहा या ठिकाणी तीन सोनसाखळी चोरी व एक मोबाईल चोरी केल्याचा प्रकार घडला होता. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे, स.पो.फौ. एस हगवणे यांच्या पथकाने केली आहे.

मोबाईल चोरटा गजाआड

पुणे लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरीच्या एका गुन्ह्यात आरोपी अंबाराय सिद्धराम पासोडी (वय -29 ,रा. केशवनगर, पुणे, मूळ. रा.अफजलपुर कर्नाटका) यास अटक करून त्याच्या ताब्यातून १७ हजार ५०० रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हस्तगत केल्याची माहिती दिली आहे. न्यायालयात त्यांना सदे केले असता, न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.