आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Chains Three Innkeepers Who Stealing And Burglarizing Houses | Burglary Crimes Revealed | 7 Bikes, 10 Mobiles, 2 Laptops, IPad Seized

टेहाळणी करत चोर्‍या, घरफोड्या करणार्‍या तीन सराईतांना बेड्या:घरफोडीचे गुन्हे उघड, 7 दुचाकी, 10 मोबाईल, 2 लॅपटॉप, आयपॅड जप्त

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जो सुरक्षारक्षक ड्युटीवर असताना झोपला त्याचा मोबाईल चोरला...याचा प्रत्यय कोंढवा पोलिसांना तीन चोरट्याना पकडल्यानंतर आला आहे. दारूच्या नशेत सुरक्षा रक्षकांचे मोबाईल आणि दुचाकी लांबविल्याचे तब्बल 15 गुन्हे उघकीस आले आहे.

कोंढवा पोलिसांनी सात दुचाकी, दहा मोबाईल, दोन लॅपटॉप, दोन अ‍ॅपल कंपनीचे आयपॅड असा तब्बल 3 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यश सागर ओंबळे (21, रा. यशवंतनगर, येरवडा, पुणे), पृथ्वीसिंग नारंगसिंग गिल (24, रा. येरवडा, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

गाड्यांची टेहाळणी करत

17 एप्रिल रोजी मध्यरात्री कोंढवा येथील भगवा चौकातील सिध्दी विहार येथे अक्षय रामदास जाधव (25) यांनी त्यांची दुकाची पार्क केली होती. सकाळी उठल्यानंतर त्यांना त्यांची दुचाकी चोरी झाल्याचे आढळून आले होते. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पथकातील अमंलदार पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील अमंलदार ज्ञानेश्वर भोसले, सुजित मदन यांना एका अ‍ॅक्टीव्हा दुचाकीवरून दोघेजण गाड्यांची टेहाळणी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तिघांना ताब्यात घेण्यात आले.

15 गुन्हे कोंढवा पोलिसांनी उघड केले

यावेळी त्यांच्याकडे केलेल्या तपासात कोंढवा पोलिस ठाण्यातील चोरीचे चार, हिंजवडी पोलिस ठाण्यातील घरफोडीचे तीन, चोरीचा एक गुन्हा, वानवडी पोलिस ठाण्यातील चोरीचे दोन गुन्हे तर हडपसर पोलिस ठाणे, चतुःश्रृंगी पोलिस ठाणे, स्वारगेट पोलिस ठाणे, विमानतळ पोलिस ठाणे, तसेच विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दतील प्रत्येकी एक गुन्हा असे 15 गुन्हे कोंढवा पोलिसांनी उघड केले.

यांनी केली कारवाई

त्यांच्याकडून सात दुचाकी, दहा मोबाईल, दोन लॅपटॉप, दोन अ‍ॅपल कंपनीचे आयपॅड असा तब्बल 3 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त पौर्णीमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर, संजय मोगले, पोलिस कर्मचारी सतिश चव्हाण, जोतीबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सुरक्षा रक्षकांना करत होते लक्ष्य

आरोपींनी मौजमजा करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून दुचाकी चोरी केल्यानंतर ते दुचाकी पेट्रोल संपेल त्या ठिकाणी सोडून जात होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विविध सोसायट्यांमध्ये कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकांना टार्गेट करण्यात येत होते. ते झोपल्यानंतर त्यांच्याजवळील मोबाईल ते चोरून नेत असल्याचे त्यांनी तपासात सांगितले. तसेच चोरी केलेले मोबाईल एकत्रितरित्या ते विकणार होते. त्या अगोदरच त्यांना अटक केली.

बातम्या आणखी आहेत...