आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:'रात गयी, बात गयी...' म्हणत चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंवर बोलणे टाळले, राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसेंनी भाजपमध्ये झालेल्या छळाचा केला होता पुनरोच्चार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अटल बस सेवेचा शुभारंभात चंद्रकांत पाटील बोलत होते.

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या. मात्र यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बोलणे टाळले आहे. 'रात गयी, बात गयी...' असे म्हणत त्यांनी खडसेंविषयीच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अटल बस सेवेचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांनी पाटलांना एकनाथ खडसे यांच्याबद्दल प्रश्न विचारला. दरम्यान, त्यांनी खडसे हा विषय आता संपला आहे असेच आपल्या विधानातून सूचित केले आहे.

एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थिती राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर बरेच आरोप केले आहेत. तसेच माझी ताकद काय आहे हे जळगावात मेळावा घेऊन दाखवून देईन, असा इशाराही खडसेंनी काल दिला. खडसेंच्या इशाऱ्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.