आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी 10 पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये 7 पोलिस कर्माचरी तर 3 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली होती.
दरम्यान, याप्रकरणी कोणत्याही पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यानंरतही पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच कर्मवीरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सगळीकडे उमटत आहे. तसेच या संबंधित प्रकरणी चंद्रकांत पाटलांनी दिलगिरी व्यक्त करूनही काल शनिवारी पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. मात्र, त्यांच्या या विधानामुळे अनेक संघटना या आक्रमक झाल्या होत्या. त्याच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी कोणत्याही पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही अशी विनंती देखील चंद्रकांत पाटील यांनी केली होती. असे असतांनाही आयुक्त अंकुश शिंदे यांनी सुरक्षेत कसूर केल्या प्रकरणी पोलिसांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.
हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करू नका - पाटील
काहींनी या घटनेचा निषेध केला तर काहींनी या घटनेचे स्वागत केले. दरम्यान, हल्ला करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये असे चंद्रकांत पाटील यांनी सांगूनही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पाटील यांच्या सुरक्षेत कसूर केल्या प्रकरणी 11 पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. यात 7 पोलिस कर्मचारी तर 3 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
चंद्रकांत पाटील हे पिंपरी-चिंचवड येथील एका ठिकाणी गेले असता त्यांच्यावर मनोज भास्कर घरबडे ( समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज (समता सैनिक दल सदस्य) आणि विजय धर्मा ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) यांनी शाई फेक केली होती. या संबंधित प्रकरणी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
निलंबीत झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांचे नाव
पोलिस निरीक्षक सतीश नांदूरकर (गुन्हे शाखा, युनिट 2),पोलिस उपनिरीक्षक प्रदीपसिंग समाधान सिसोदे (गुन्हे शाखा),गणेश दत्तू माने (चिंचवड पो.स्टेशन), ए एस आय भाऊसाहेब मुरलीधर सरोदे (चिंचवड पो.स्टेशन), ए एस आय दीपक महादेव खरात (गुन्हे शाखा),पो. हवालदार प्रमोद सूर्यकांत वेताळ (गुन्हे शाखा), पो.नाईक देवा शिवाजी राऊत (गुन्हे शाखा), पो. नाईक सागर दशरथ अवसरे (गुन्हे शाखा), महिला पो. कांचन प्रशांत घवले (चिंचवड पो.स्टेशन), महिला पो. प्रियांका भैय्यालाल गुजर (मुख्यालय).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.