आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात भाजपचा पराभव:चंद्रकांत पाटलांनीच माझा विजय सोपा केला, विजयानंतर महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांचा पाटलांना खोचक टोला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत.

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे. पुणे या भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराने विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल 20 वर्षांनंतर भाजपाला पराभव स्वीकारावा लागला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी तब्बल 48 हजार 824 मतांनी विजय मिळवला आहे. आता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांमुळेच माझा विजय सोपा झाला असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी विजयानंतर चंद्रकांत पाटली यांना खोचक टोला लगावला. चंद्रकांतदादांनीच माझा विजय सोपा केला असल्याचे ते म्हणाले आहेत. लाड म्हणाले की, 'चंद्रकांत पाटलांनीच माझा विजय सोपा केला आहे. ते दोन वेळा निवडून गेले. पण त्यांनी पदवीधरांसाठी काहीच केले नाही. ज्यांच्यामुळे निवडून गेले त्यांच्यासाठी काहीच न करता फक्त राजकारण केले. त्यांची प्रश्ने त्यांनी समजून घेतली नाही. यामुळे जनता चिडली होती. दोन्हीही वेळी त्यांनी काही कामे केली नाही. आता राहिलेली कामे नवा उमेदवार देशमूख करतील असे ते म्हणाले होते. पण त्यांच्याकडून काही होणार नाही असे समजून जनतेने मला मते दिली' अशी प्रतिक्रिया लाड यांनी दिली आहे. तसेच जनतेने निवडून दिल्याने त्यांचे प्रश्न मी सोडवेल असे आश्वासनही लाड यांनी दिले आहे.

महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत. भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची 73321 मते मिळाली आहेत. तब्बल 48 हजार 824 मतांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser