आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''अमोल कोल्हेंना वाटले की आपण भाजपमध्ये जावे, तर अशा शिवाजीराव आढळराव पाटील यांची समजूत घालावी लागेल असे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते एका मुलाखतीत बोलत होते.
चर्चेला पुन्हा उधाण
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस नेते, शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महत्वाच्या बैठका आणि इव्हेंटला गैरहजर राहत आहेत. कसबापेठ निवडणुकीतही ते अलिप्त होते. त्यांची भाजप नेत्यांची जवळीक पाहता ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या धर्तीवर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे.
भुमिकेविषयी शंका कायम
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. पक्षाच्या कार्यक्रमांना येत नाहीत, असा आरोप केले आहेत. दरम्यान, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत स्टार प्रचारकांत नाव असूनही कोल्हे यांनी एकाही सभेत हजेरी लावली नाही. त्यामुळे पुन्हा त्यांच्या भूमिकेविषयी शंका निर्माण झाली होती.
भाजपमुळे शिंदेंना फायदा होणार
चंद्रकांत पाटील म्हणाले, "भाजपसोबत आलेल्या शिंदे गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयांचा फायदा होणारच आहे. आता मात्र महाराष्ट्रातील परिस्थिती कधी नव्हे इतकी अस्थिर झाली आहे. ही स्थिती सतत बदलत आहे. त्यामुळे जागावाटपबाबत आत्ताच काही निर्णय घेता येणार नाही."
हे आत्ताच कसे ठरवणार?
चंद्रकांत पाटील म्हणाले, "लोकसभा निवडणूक प्रक्रिया डिसेंबर-जानेवारी महिन्यात सुरू होईल. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूक होईल. राज्यातील राजकीय स्थिती पाहता शिरुर लोकसभेच्या जागेबाबत आत्ताच कसे ठरवणार? समजा उदाहरण म्हणून कोल्हेंना वाटले की आपण भाजपमध्ये जावे, तर त्यांनी शिंदे गट का भाजपकडून निवडणूक लढवायची ते ठरवावे लागेल."
आढळराव यांची समजूत घालावी लागेल
चंद्रकांत पाटील म्हणाले, आढळराव पाटील यांच्या उमेदवारीबाबत मोठे विधान केले. पाटील म्हणाले अमोल कोल्हे यांना वाटू शकते की, आपण भाजपमध्ये जावे, अशा वेळी आढळराव पाटील यांची समजूत घालावी लागेल.
वारा, आभाळ बघून गणित बांधावे लागते
चंद्रकांत पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्याबाबत एक लक्षवेधी विधान केले. ते म्हणाले, पक्ष बदलाबाबत खासदार कोल्हे यांनीच संदिग्धता निर्माण केली. "मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. एक गोष्ट पक्की की, शेतकरी उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही. वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचे असते आणि मग वावर नांगरायला घ्यायचे असते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.