आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात नितांत आदर; उद्धव ठाकरेंना फोन करून भूमिका समजावून सांगणार- चंद्रकांत पाटील

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. बाबरी पाडली तेव्हा पक्षाचे नव्हे तर विश्व हिंदू परिषदेचे नेतृत्व होते, असे मी म्हणालो होता. मात्र, माझ्या वक्तव्याचा नेहमीप्रमाणे 'ध'चा 'मा' करण्यात आला, असा खुलासा भाजप नेते ंचंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

बाबरी पाडण्यात शिवसेना तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग नव्हता, असा दावा चंद्रकांत पाटलांनी केल्याने उद्धव ठाकरेंनी त्याच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच, ठाकरे गटाकडूनही चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे. त्यावर आज पुण्यात पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.

मी अनादर केला, हे सहन करणार नाही

चंद्रकांत पाटील म्हणाले, बाबरी आंदोलनात आम्ही सर्व जण हिंदू म्हणून सहभागी झालो होतो. बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी त्यांचा अनादर केला, ही बाब मी सहन करणार नाही. बाबरी पाडताना तिथे शिवसैनिक होते. फक्त ते विश्व हिंदू परिषदच्या नेतृत्वात सहभागी झाले होते. बाबरी पाडताना संजय राऊत कुठे होते? हा माझा मुख्य सवाल होता, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

बाबरी पाडताना सर्व हिंदू होते

चंद्रकांत पाटील म्हणाले की, विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात हा संघर्ष झाला. त्यावेळी सर्व जण हिंदू म्हणून तिथे होते, कुणीही तिथे पक्ष म्हणून सहभागी झाले नव्हते. बाबरी पाडली तेव्हा शिवसेना होती यावर माझा आक्षेप आहे. जयंत पाटील काय म्हणाले यांची काळजी करण्याची मला गरज नाही. मला उद्धव ठाकरे काय म्हणाले यांची काळजी असायला हवे. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी माझ्यामनात श्रद्धा आहे. उद्धव ठाकरेंच्या टिपण्णीवर मी काही बोलणारच नाही.

शिंदेंनी फोन केला

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करुन पत्रकार परिषद घेण्याचे सांगितले. मी उद्धव ठाकरे यांना फोन करुन चर्चा करणार आहे. माझे असे मत नव्हते हे मी त्यांना स्पष्ट करणार आहे.

संबंधित वृत्त वाचा

प्रत्युत्तर:मंत्री चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा, अन्यथा एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा; 'बाबरी' वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची मागणी

मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अन्यथा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. बाबरी पाडली तेव्हा, एकही शिवसैनिक नव्हता, असे वक्तव्य करून पाटील यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्याला पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर दिले. वाचा सविस्तर

हिंदुत्वावर सवाल:बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते? आता बोलण्याचा काहीही अधिकार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बाबरीच्या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जे काही वक्तव्य केले आहे, त्याविषयी मी त्यांच्याशी बोललो आहे. मात्र, बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?, असा उलट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. वाचा सविस्तर

घमासान:संजय राऊतांचा सवाल; चंद्रकांत पाटलांचा दावा शिंदेंना मान्य आहे का? खऱ्या आईचे दूध प्यायले असेल तर राजीनामा द्यावा

बाबरी पाडली त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही. बाबरी पाडण्यात बाळासाहेबांची कोणतीही भूमिका नव्हती, असा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे.​​​​​​​वाचा सविस्तर