आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे उमेदवार आज रात्री घोषित होणार:चंद्रकांत पाटील यांची माहिती; कसबा, चिंचवडच्या इच्छुकांची नावे दिल्लीकडे पाठवली

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेवारांची नावे आज संध्याकाळपर्यंत, रात्री उशिरा दिल्लीतून घोषित होतील, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

महायुतीमधल्या घटक पक्षांचा या निवडणुकीबाबत मेळावा झाला. या मेळाव्याला सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गाफील राहणार नाही...

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही खूप ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहोत. ही परंपरागत जागा आहे. मात्र, निवडणुकीत कधीही धोका पत्करण्याचा नसतो. गाफील राहायचे नसते. त्यामुळे महायुतीमधल्या सगळ्या घटक पक्षांचा प्रमुख नेत्यांचा मेळावा झाला.यावेळी बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम संघटना, पतीत पावन संघटना या सगळ्यांचे शहर आणि कसाब स्तरावरचे प्रमुख नेते उपस्थित होते.

रासनेंचे नाव चर्चेत

चंद्रकांत पाटील म्हणाले की, सहा तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे. यावेळी सगळे नेते उपस्थित राहणार आहेत. प्रदेश भाजपची काल बैठक झाली. आमच्याकडून एकमत झालेल्या नावांची यादी ही केंद्र नेतृत्वाकडे गेली आहे. केंद्राचे पार्लमेंटरी बोर्ड आज संध्याकाळपर्यंत कसबा आणि चिंचवडची नावे घोषित करेल. दरम्यान, कसबा येथून हेमंत रासने यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते.

आम्ही भित्रे नाही...

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, आम्ही सगळे सहनशील आहोत म्हणजे भित्रे नाही. कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला, याची वेगळी प्रेस कॉन्फरन्स करण्याची इच्छा आहे. सर्वांनी आमच्याप्रमाणे सर्व जागा जिंकण्याचा दावा केला. मात्र, कोकणची जागा आम्ही आठ हजारांच्या मतांनी जिंकली. नाशिकमध्ये काय झाले माहिती आहे. मतांचे बाद प्रमाण होण्याचे प्रमाण मोठे आहे. अमरावतीमध्ये ४ हजार मते बाद झाल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...