आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील चतुःश्रृंगी देवस्थानासाठी दीड कोटींचा निधी:लवकरच विकासकामे मार्गी लावणार, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुण्यातील चतुःश्रृंगी देवस्थानला मूलभूत विकासकामे मार्गी लावण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती शुक्रवारी येथे देण्यात आली.

शहरातली 'क' वर्ग पर्यटनस्थळांवर मूलभूत विकासकामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 2 कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यापैकी पुण्यातील चतुःश्रृंगी देवस्थान परिसरात विविध विकासकामे करण्यासाठी दीड कोटी रुपये मिळणार आहेत. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार हा निधी जाहीर करण्यात आला आहे.

चतुःश्रृंगी मंदिर परिसरात उद्यानाची निर्मिती आणि सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी या निधीचा विनियोग करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थान पदाधिकार्यांनी दिली.

देवस्थान परिसरात मूलभूत विकासकामे गरजेची होती, त्यासाठी आता निधी उपलब्ध झाला आहे. आमदार माधुरी मिसाळ यांनी त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या निधीमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील असा विश्‍वास वाटतो, असे मत देवस्थानचे अध्यक्ष नंदकुमार अनगळ यांनी व्यक्त केले आहे.

शहरातील धार्मिक स्थळांचा विकास होण्यासाठी या निधीची मदत होणार आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मी आभार मानते. जी-20 परिषदेच्या माध्यमातून भारताचा समृद्ध वारसा, इतिहासाचे संवर्धन करून तो जगभर पोहोचविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जी-20 च्या निमित्ताने शहरातील विविध ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करून, हेरिटेज कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

दरम्यान शुक्रवारी शाकंभरी नवरात्र उत्सव निमित्त चतुःश्रृंगी देवी मंदिरात आज भाज्यांची आरास करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...