आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकारण:'इतर वृत्तवाहिन्यांना मुलाखत देऊन तर दाखवा', 'मुलाखत सुरू असताना सरकार पाडा' असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर चंद्रकांत पाटलांचा पटलवार

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. काल आणि आज ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडूनच दाखवा असं थेट आव्हानच विरोधीपक्षाला दिलं होतं. आता त्यांच्या आव्हानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. 'तुम्ही इतर वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन दाखवा' असा पलटवार त्यांनी केला आहे. पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारव सातत्याने विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. तसेच राजस्थान सरकारमधील गहलोत सरकार सध्या संकटात सापडले आहे. आता महाराष्ट्रातही तसेच होणार अशा चर्चा सुरू आहे. दरम्यान विरोधकांकडून वारंवार सरकार पाडणार असल्याची वक्तव्ये येत असतात. यावर बोलता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला आव्हान दिले होते. सामनाला देत असलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडून दाखवा. यावर चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, हिंमत असेल तर त्यांनी इतर माध्यमांना मुलाखत देऊन दाखवा, मुलाखत घेणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहेत, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

राज्यात दोन मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसूनच राज्यातील काम पाहत आहेत. यासोबतच कोरोनाचाही आढावा घेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्यभर दौरे करत आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यावरही चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत शरद पवारांवरही टीकास्त्र साधले आहे. ते म्हणाले की, राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मातोश्रीमध्ये, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत. असा टोला त्यांनी लगावला आहे.