आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपूर्ण महाराष्ट्रात आठ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना सरकारवर सर्वसामान्य माणसाचा विश्वास आहे, प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळवायचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले.
भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही सर्वजण ताकतीने या निवडणुकीत उतरलो आहोत कारण प्रत्येक गोष्ट नीट व ताकतीने करायची ही भाजपची कार्यपद्धती आहे. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण प्रचार कार्यात सहभागी झालो आहोत. ही जागा सोपी आहे, भाजपची परंपरागत आहे. ती प्रतिष्ठेची आहे. कारण परंपरागत जागा नुसती जिंकून उपयोगाची नाही, तर मोठ्या मताधिक्याने जिंकायची आहे.
दिग्गज मैदानात
विधानसभेच्या दोन जागेसाठी कसबा आणि चिंचवड येथे पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे भाजप आणि शिंदे गटातील दिग्गज प्रचारफेरी काढीत असून दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवारांसारखे खंदे नेतेही मैदानात उतरल्याने लढत मोठी चुरशीची होत आहे.
पवारांनी डागली तोफ
आज शरद पवार यांनी भाजपकडून शासकीय यंत्रणांचा आणि संस्थांचा गैरवापर केला जात आहे. भाजप नेतृत्वाला विरोध करणार्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला जातो. निवडणुक आयोगसुद्धा एकाचा पक्ष दुसर्याला देण्याचा पक्षपाती निर्णय घेत आहे, असा आरोप केला. ते अल्पसंख्यांक मेळाव्यात आज पुणे येथे बोलत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.