आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबियांनाच तिकीट:चंद्रकांत पाटलांचे संकेत, म्हणाले- कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करू

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणात काम करताना आमदारकी निवडणूक लढण्याची इच्छा कार्यकर्त्यांची असणे यात चुक, गुन्हा काही नाही. यासाठी आमची पक्षाची रचना असून नियमितपणे याबाबत आम्ही भेटत असताे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कुटुंबियांना तिकिट देण्याबाबत काेणाचे दुमत नाही मात्र, यासंर्दभातील निर्णय पक्षाची काेअर कमिटी करेल. कसबा व चिंचवड मतदारसंघातील निवडणुक बिनविराेध करण्यासाठी सर्व पक्षांना लेखी पत्र देवून व भेटीगाठी घेऊन आव्हान करणार असल्याचे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा पाेटनिवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघातील भाजप पक्षाचा आढावा घेण्यासाठी ते आले हाेते. त्यावेळी पत्रकारांशी बाेलत हाेते.

म्हणून पोटनिवडणूकीच्या तारखेत बदल

चंद्रकांत पाटील म्हणाले, सुरुवातीला कसबा व चिंचवड मतदारसंघातील निवडणुक 27 फेब्रुवारी राेजी हाेणार हाेती, परंतु ताे साेमवार कामाचा दिवस असल्याने मतदान कमी हाेईल यादृष्टीने निवडणुक आयाेगाने सदर निवडणुक 26 फेब्रुवारी राेजी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. मतदार यादीत सर्व नागरिकांची नावे यावीत आणि माेठ्या प्रमाणात मतदान वाढावे यादृष्टीने निवडणुक आयाेग प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुक तारखेत बदल केला आहे.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न

चंद्रकांत पाटील म्हणाले, संबंधित दाेन जागावरील निवडणूक बिनविराेध करण्याचे दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु भाजप पुरेसा आधी विचार आणि परिपूर्ण विचार तंत्रानुसार काम करत आहे. उमेदवार ठरविण्यासाठी आम्ही आजची बैठक घेतलेली नसून उमेदवार ठरविण्याबाबतची पक्षाची प्रक्रिया ठरलेली आहे. इच्छुक उमेदवारांची नावे प्रदेशाकडे पाठवली जातात. प्रदेशाची काेअर कमिटी सदर नावे केंद्रीय पार्लमेंटरी बाेर्डकडे पाठवतात. पाेटनिवडणुकीच्या अनुषंगाने विविध कामांचे तयारीचा आढावा यादृष्टीने घेण्यात आला आहे.

मुरलीधर मोहळ यांच्यावर जबाबदारी

चंद्रकांत पाटील म्हणाले, बैठकीत तीन प्रमुख घाेषित करण्यात आले. संघटनात्मक प्रमुख बुथरचना, त्यावरील कामाची विभागणी निश्चित करतील. त्याकरिता शहर संघटनाप्रमुख अमाेल थाेरात यांची नियुक्ती करण्यात आली. व्यवस्थात्मक कमिटी नियुक्त करण्यात आली ती नेत्यांना बाेलवणे, उमेदवारी अर्ज भरणे यासाठी माजी नगरसेवक बापू काटे यांना नेमण्यात आले. विविध राजकीय पक्षाशी संवाद साधणे करिता शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली. कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सहा समित्यांचे प्रमुख हे पुण्याचे माजी महापाैर व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर माेहाेळ असून ते सर्वांचा आढावा घेतील.

बातम्या आणखी आहेत...