आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे महापालिकेचे विभाजन करा:मंत्री चंद्रकांत पाटील यांची मागणी; ऐन निवडणुकांच्या तोंडावर नव्या चर्चेला फुटले तोंड

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुणे महापालिकेचे विभाजन करा, अशी मागणी उच्च, तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

पाटील यांचा ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले पाटील?

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुणे महापालिकेचे क्षेत्र वाढत आहे. आधी यामध्ये 11 गाव समाविष्ट केली होती. त्यानंतर पुन्हा 23 गाव समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे पुण्याचे भौगोलिक क्षेत्र हे देशातील कोणत्याही महापालिकेपेक्षा मोठे झाले आहे. या समाविष्ट गावातील नागरिकांना सोयी - सुविधा द्यायच्या असतील, तर पुणे महापालिकेचे विभाजन करण्याची गरज आहे. पाटील म्हणाले, पुणे हे सुरक्षित शहर आहे. त्यामुळे जितके युनिट लहान तितका त्यांचा विकास लवकर व सहज होतो. त्यामुळे पुणे महापालिकेचे दोन भाग होणे गरजेचे आहे.

कामाचे तास ठरवा

पाटील म्हणाले, माध्यम क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे पत्रकारांना 24 तास काम करावे लागत आहे. अलीकडे पत्रकारांमध्ये महिलांची संख्याही मोठी आहे. याची दाखल घेवून पत्रकारांचे ‘ड्यूटी आवर्स’ ठरवण्याची गरज आहे. तसेच त्यांना स्थैर्य देण्यासाठी ही पत्रकारांच्या संघटनांनी काम करणे गरजेचे आहे. अलीकडचे पत्रकार जणूकाही एखाद्याची सुपारी घेतल्यासारखे वार्तांकन करताना दिसतात.अशा पत्रकारांना आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. नवोदित पत्रकारांसाठी ज्येष्ठ पत्रकारांच्या कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. जेणेकरून प्रशिक्षणार्थी पत्रकारांना त्यांच्या अनुभवातून अभ्यासपूर्ण माहिती मिळेल. तसेच सध्यस्थितीत खऱ्या पत्रकाराची गरज का आहे? याचे महत्त्व पटेल. यामुळे मुंबई पुण्यातील पत्रकारांना एक व्हिजन देण्याचे काम होईल. त्याच बरोबरीने इतर जिल्ह्यातील पत्रकारांना एक व्यासपीठ उपलब्ध होईल.

कोरोनात पालक गमावलेल्यांना मदत

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, काेराेनात ज्यांनी दाेन पालक गमावले त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करण्यात आली आहे. दाेन काेटी ७९ लाख रुपये त्यासाठी देण्यात आले आहेत. वैद्यकीय आणि अ‌ॅग्रीकल्चरचा त्यात समावेश नाही. ज्यांचे एक पालक काेराेनात गमावले त्यांच्याबाबत आकडेवारी गाेळा करण्यात येईल. हा विषय अद्याप तीव्रतेने आला नसून मी त्यासंर्दभात आकडेवारी गाेळा करताे. दाेन पालक गमावलेले १९०० विद्यार्थी आहेत. त्यात ही वाढवली तर किती हाेईल आणि खर्च किती करण्यात येईल, याबाबत माहिती जमा करण्यात येईल. सकारात्मक भूमिकेतून याबाबत काम करण्यात येईल

बातम्या आणखी आहेत...