आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये नुकतेच शाईफेक करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पाटील यांच्या सुरक्षेत अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोले या फेसबुक अकाउंट धारकावर पुण्यातील कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.
यासंदर्भात स्वप्नील बाबासाहेब बांगर (वय-33 रा. कोथरुड,पुणे) यांनी शुक्रवारी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी विकास लोले अध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया चिंचवड विधानसभा या नावाच्या अकाऊंट धारकावर आयपीसी 117, 153 (अ)-1(ब),500, 505 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी स्वप्नील बंगर हे राहत्या घरी त्यांच्या मोबाईलमध्ये फेसबुक पाहत असताना, त्यांना राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट दिसून आली आहे.
पोस्टमध्ये काय?
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोले या फेसबुक अकाउंट धारकाने केली होती. यामध्ये 'चंपाच तोंड काळे केले रे, आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार?मु.पो. सांगवी, पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या' अशा आशयाची पोस्ट लिहिण्यात आली होती. संबंधित मजकूर असलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करुन दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पुढील तपास कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस राठोड हे करीत आहेत. पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरील हल्ल्याच्या पार्शवभूमीवर त्यांच्या सोबत वेगवेगळ्या यंत्रणा मधील 65 पोलिस कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कवच पुरवले आहे. याशिवाय स्थानिक पोलिस यांचा ही प्रत्येक कार्यक्रम ठिकाणी बंदोबस्त देण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.