आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाेक्याचा वापर करणाऱ्यांनीच राज्याची वाट लावली:चंद्रकांत पाटलांची 'मविआ'वर टीका, जयंत पाटलांच्या वक्तव्याचा घेतला समाचार

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खाेक्याचा विषय आम्हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने आंब्यासाठी, एखाद्या वस्तूसाठीचे खाेके इतकाच हाेताे. परंतु खाेक्याचा विराेधकांना माहिती असणारा अर्थ त्यांनी घेतल्याने वर्षानुवर्ष राज्याची वाट लागलेली आहे, अ​​​​​सा टोला भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात लगावला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात सुरू असलेल्या खोक्याच्या राजकारणावत जोरदार टीका केली होती. त्याचा चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला.

काय म्हणाले होते जयंत पाटील?

खाेक्याचे विषय असतील तर ते बंद खाेलीत चर्चा हाेऊन मिटू शकतात, त्यासाठी बाहेर चर्चा करण्याची गरज नाही, असा टाेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला रवी राणा-बच्चू कडू यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर लगावला हाेता.

माझ्याकडे दहा विषय

चंद्रकांत पाटील म्हणाले, खाेके काेणी काेणाला दिले, खाेक्याचा वापर काेणी केला याबाबत टीका करणाऱ्यांचे माझ्याकडे दहा विषय असून ते आगामी काळत आम्ही उपस्थित करू. एखादे टेंडर का निघाले, ते काेणाला दिले गेले, कशाप्रकारे नियम डावलले गेले याबाबत वेगवेगळया खात्यांकडे ढीगभर विषय आहे.

डिपाॅझिट जप्त झालेल्यांकडूनच चर्चा

नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुक कधी हाेणार याबाबत पाटील म्हणाले, संबंधित विषय हा न्यायालयीन प्रक्रियेत आहे. सर्वाच्च न्यायालयाने सदरचा विषय हा उच्च न्यायालयाकडे सुपुर्द केला असून न्यायालयीन प्रक्रियेत विषय असताना त्यावर भाष्य करणे याेग्य नाही. गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर येईल अशी चर्चा रंगू लागली याबाबत ते म्हणाले, गुजरातची निवडणुक जवळ आल्यावर ज्यांचे डिपाॅझिट मागील निवडणुकीत जप्त झाले ते अशाप्रकारे भाष्य करतात.

लाेकशाहीत त्यांना वेगवेगळे दावे करण्याचा अधिकार आहे, परंतु सन 1985 पासून गुजरात मध्ये भाजप शिवाय दुसरा काेणताही पक्ष सत्तेत आलेला नाही. महाराष्ट्रातील भाजप-सेना आणि सहयाेगी पक्षाचे अपक्ष सदस्य यांच्यात काेणते मतभेद असतील तर त्याबाबतची साेडवणुक करण्यास एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस समर्थ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सामन्यात सरकारी जाहिरात

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार जणांना राेजगार देण्याचा संकल्प केंद्र व राज्य सरकारने केला असून त्याबाबतची जाहिरात वेगवेगळ्या वृत्तपत्रांना देण्यात आली आहे. मात्र, संबंधित जाहिरात शिवसेनेचे मुखपत्रात छापली गेल्याने वाद-प्रतिवाद सुरु झाले. याबाबत पाटील म्हणाले, शिवसेनेचे मुखपत्र हे व्यवसायिक वृत्तपत्र असून या जाहीरातीवर टिका करणे याेग्य नाही. शासनाचे निर्णय सर्वसामान्यां पर्यंत पाेंहचविण्याकरिता विविध वृत्तपत्रांना जाहीरात दिली जाते, त्यानुसार ती साममानला ही दिली गेली आहे.

राहुल गांधीच्या प्रयाेगांना यश नाही

काँग्रेसच्या भारत जाेडाे यात्रे अंर्तगत राहुल गांधी महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर येतात याबाबत पाटील म्हणाले, सदर यात्रा ही काँग्रेसची असल्याने तिचे आम्ही स्वागत करण्याचे कारण नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार असून ते वेगवेगळे माध्यम वापरतात. राहुल गांधी यांनी आतापर्यंत अशाप्रकारे अनेक प्रयाेग करुन पाहिले परंतु त्यांना यश मिळाले नाही.

बातम्या आणखी आहेत...