आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेशल बर्थ डे गिफ्ट:चंद्रकांतदादा हिमालयात जा, महाविकास आघाडीकडून वाढदिवसाचं हटके गिफ्ट

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूडचे आमदार यांचा आज वाढदिवस त्यांच्या मतदार संघात कार्यकर्त्यांनी साजरा केला. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना अनोखे गिफ्ट दिले. निवडणुकीत हरलो तर हिमालयात जाईल या वक्तव्याची आठवण करून देत त्यांना हिमालयात पाठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून जमा करण्यात आलेला निधी हा कुरियरच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीत हरतो तर हिमालयात जाईन असे वक्तव्य केले होते. कोल्हापूर येथील निवडणूकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना हिमालयात जाण्याची आठवण करून दिली होती. एवढेच नाही तर त्यांना हिमालयात जाण्यासाठी निधीही गोळा केला होता. आज हा निधी राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील यांनी चंद्रकांत यांना वाढदिवसानिमित्त कुरीअर करत भेट दिला. तसेच त्यांना पुन्हा हिमालयात जाण्याची आठवण करून दिली.

रूपाली पाटील म्हणाल्या, राज्यात महिला असो किंवा समाज याच्याविषयी नेहमी बेताल वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना हिमालयात जाण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याची व्यवस्था महाविकासआघाडीकडून करण्यात आली आहे. त्यांनी त्याच्या वक्तव्याला जागावे आणि हिमालयात जावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान चंद्रकात पाटील यांनी सुप्रीया सुळे यांना घरी जा स्वयंपाक करा असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी रूपाली पाटील त्यांनी या त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांच्या अशा या बेताल वक्तव्यामुळे त्यांना खरेच हिमालयात जाण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...