आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यजित तांबेंनी मविआचा दारुण पराभव केला:चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले - त्यांनी निर्णय घ्यावा आमची दारे सदैव उघडी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने कधीच शिक्षक मतदारसंघातील पाच जिंकणार असे म्हटले नाही, तर सदर जागा जिंकणे प्रयत्न करू असे सांगितले होते. नाशिकमध्ये राजेंद्र विखे पाटील यांना उमेदवारी देणार होतो परंतु त्यांनी निवडणूक लढवणे तयारी दर्शवली नाही. स्थानिक पातळीवर सत्यजित तांबे यास मदत केली आहे. ते चांगले तरुण असून यापुढे काम करतील. आमचे खासदार, आमदार, टीम ही तांबे यांच्या बाजूने उभी होते. त्यांनी पुढे कोणता निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवले पाहिजे. त्यांना कोणती ऑफर आम्ही दिलेली नाही. कोणी आमच्या पक्षात येत असेल तर त्यांचे स्वागत आहे आमची दारे सर्वांसाठी उघडी आहे. तांबे यांनी महविकास आघाडी उमेदवाराचा दारुण पराभव केला आहे. असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूरमध्ये शिक्षक परिषद नेहमी निवडणूक लढवत असते. त्यांना आम्ही समर्थन करतो कधी आम्ही ती जागा लढत नाही. भाजपने ती जागा लढली असती तर निश्चित जिंकली असती. अमरावतीमध्ये चिंतन करण्याची पक्षाला गरज आहे ते आम्ही करू. रणजित पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाचे मत मिळाली आहे. त्यांना एक क्रमांक देण्यात आला नाही ते स्थान रिकामे ठेवण्यात आले, त्यामुळे सहा हजार मते वाया गेली.

कोकणात आम्ही कधी जागा लढत नव्हतो परंतु ती जागा आम्ही लढलो आणि कोकणमध्ये प्रथमच जागा जिंकलो आहे. मराठवाडामध्ये एक महिन्यापूर्वी आम्ही उमेदवार दिला होता. महाविकास आघाडीने कोणती ही आमची जागा जिंकलेली नाही. मते न मिळण्याचे जुनी पेन्शन योजना हे एक कारण असेल तर ठाणे, कोकण मध्ये आमचा अधिकृत उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे याबाबत इतर शोधू.मराठवाडा, अमरावती, नागपूरमध्ये नेमके का हरलो याची चिंता आम्ही करू. महाविकस आघाडी केवळ अमरावती जागा जिंकली आहे. त्यामुळे सरकारचा पराभव झाला म्हणणे योग्य नाही. ग्रामपंचायत निवडणूकमध्ये भाजप आणि शिंदे गट अग्रेसर राहिलेला आहे.

बावनकुळे पुढे म्हणाले, कसबा आणि चिंचवड मतदारसंघात उमेदवार बाबत नावे मी केंद्रीय पार्लमेंटरी समितीकडे पाठवली ती आज जाहीर केली जातील. माहविकास आघाडी नेते यांना मी विनंती करतो की, संबंधित दोन जागा या केवळ दीड वर्षसाठी राहिलेला असून ही भाजपची जागा असल्याने ती बिनविरोध निवडणूक करावी. भाजप मध्ये कोणी नाराज नाही. आगामी लोकसभा , विधानसभा निवडणूक पुन्हा जिंकू. एखाद्या विजय किंवा पराभवाने विश्लेषण करता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...