आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रशेखर बावनकुळेंची शरद पवार, उद्धव ठाकरेंना विनंती:केवळ 7, 8 महिन्यांचा कालावधी उरलाय; पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्या

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसबा व चिंचवड मतदारसंघाच्या आमदारांचे आजारपणामुळे निधन झाल्यामुळे या पोटनिवडणुका होत आहे. निवडून येणाऱ्या आमदारालाही केवळ 7, 8 महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्या, अशी विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी मविआ नेत्यांना केली आहे.

कसबा पेठमध्ये हेमंत रासने यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. भाजपने आज शक्तीप्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती करतो. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा भाजपच्या आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी फार कमी अवधी बाकी आहे. सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये. आमच्या जागा आमच्यासाठी सोडाव्यात.

उमेदवार बदलता येईल

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 48 तासांत उमेदवार बदलतो, निवडणूक बिनविरोध करणार का? असे आव्हान महाविकास आघाडीला दिले होते. त्यासंदर्भात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनीही वेळ आहे, उमेदवार बदलता येईल, असे सांगत विरोधकांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

मविआचे ठरले:कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेस लढणार

महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल तर टिळकांना उमेदवारी दिली जाईल. चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे नेतृत्व विचार करेल. चंद्रकांत पाटील यांची भूमिका पक्षाला मान्य आहे. महाविकास आघाडीने आज तसे कळवले तर उद्याचा दिवस बाकी आहे. उमेदवार बदलण्याचा निर्णय निश्चितपणे घेता येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

ब्राह्मण समाजावर अन्याय नाही

मुक्ता टिळक यांना उमेदवारी नाकारल्याने पुण्यात ब्राह्मण समाज नाराज झाल्याचे बॅनर्स आज पुण्यात लागले आहेत. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुक्ता टिळक हयात असत्या तर उमेदवारी कोणाला द्याची हा प्रश्नच नव्हता. भाजप कोणालाही डावलत नाहीये. ब्राह्मण समाजाने भाजपासाठी आयुष्य दिले आहे. महाविकास आघाडीने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा दिला तर उमेदवार बदलण्याचा विचार करण्यात येईल. भाजप कुणावर अन्याय करत नाही.

संबंधीत वृत्त

कसब्यातून ठाकरे गटाचा मित्र पक्ष संभाजी ब्रिगेड मैदानात:वंचितही लढण्याच्या तयारीत; 'मविआ'ला बसणार फटका, शिवसेनेची कोंडी

ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. मात्र संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शिवसेना चांगलीच कोंडीत अडकली आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...