आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामोशी समाज संघटित ठेवणे ही काळाची गरज:उमाजी नाईक महामंडळ राज्यात निर्माण झाले पाहिजे - चंद्रशेखर बावनकुळे

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामोशी समाज संघटित ठेवणे ही काळाची गरज आहे. समाजात दुखणे निर्माण झाल्यास आपल्याला कुणीही विचारणार नाही. मात्र, आपण संघटित समाजाच्या स्वरूपात मागणीची मांडणी केल्यास त्याची पूर्तता होऊ शकेल उमाजी नाईक महामंडळ राज्यात निर्माण झाले पाहिजे त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी पाठपुरावा करू, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

जय मल्हार क्रांती संघटना आयोजित उमाजी नाईक यांच्या 191 व्या पुण्यतिथी मानवंदना सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राहुल कुल, माजी महापौर आणि भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत देशमुख, मनसे नेते वसंत पवार, दौलत शितोळे उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, उमाजी नाईक यांचा विचार घेऊन आपण पुढील संघर्ष करण्यासाठी तयार झाले पाहिजे. जो समाज संघटित होतो तो संघर्ष करू शकतो. कोणतेही सरकार ,व्यवस्था असेल तर संघटित समाज न्याय मिळवू शकतो. समाजाला आता न्याय मिळाला नाही तर मोठा संघर्ष उभा करू ही ताकद समाजात आली पाहिजे. अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारे अधिक दोषी असतात असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे.आपण आत्तापर्यंत अनेक अन्याय सहन केले यापुढे ते करू नका, नाहीतर भावीपिढी आपल्याला माफ करणार नाही.

पडळकर म्हणाले, आता आपला कोण चुकीचा वापर करत असेल तर त्याविरोधात बंड केले पाहिजे. सध्याची पिढी ही बदललेली असून सर्वांचे प्रश्न सारखे आहे. भाजपच्या माध्यमातून आपल्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. सोलापूर विद्यापीठस अहिल्याबाई होळकर देण्याचे प्रयत्न भाजपने केले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांना वाटले नाही. देवेंद्र फडणवीस यांना वाटले समाजातील अपेक्षित ओबीसी लोकांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे ही बाब पवार यांना कधी करू वाटली नाही. प्रत्येक जिल्ह्यात आपल्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करण्यात आली आहे.

महाज्योती संस्था माध्यमातून स्पर्धा परीक्षा तयारी मुलांना करता येऊ लागली आहे. बहर्जी नाईक यांचे उचित स्मारक करण्याचा निर्णय फडणवीस यांनी केला आहे, त्याकडे आघाडी सरकारने दुर्लक्ष्य केले होते. अनेक पुढाऱ्यांची थडगी बांधण्यासाठी राज्यात 10-20 कोटी रुपये खर्च करण्यात आले. अशाप्रकारे अनेक क्रांतिकारक राज्यात होऊन गेले त्यांचे स्मारक बनवणे कोणाला वाटले नाही. समाजात कोणी फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला बळी पडू नका.

बातम्या आणखी आहेत...