आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सत्ताकारण:शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार असल्याच्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांचा घुमजाव

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

'राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत,' या वक्तव्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घुमजाव केला आहे. माझे विधान माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे पाटील म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'माझे विधान चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले. मी म्हणालो होतो की, जर उद्या आमच्या पक्षाचे सरकार आले, तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व विधानसभा, लोकसभा आम्ही स्वबळावरच लढणार आहोत. भाजपच्या वोट बँकेवर आणि नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर जिंकून यायच आणि नंतर काही तिसरचं करायचं, हे आता चालणार नाही. त्यापेक्षा प्रत्येकाने स्वतंत्र लढावं. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे सरकार येण्याबाबत हा विषय नव्हता, तर निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबतचा विषय होता. शिवसेनाच काय इतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव नाही,' असे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले.

Advertisement
0