आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 लाख 32 हजारांचे चरस जप्त:अंमली पदार्थ विरोधी पथकाची पुण्यात कारवाई, दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनकडून 16 लाख 32 हजारांचा चरस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

अमीर मसीउल्ला खान (24, रा.ताडीवाला रोड, मुळ उत्तर प्रदेश) आणि अतुल गौतम वानखेडे ( 22, रा.ताडीवाला रोड, मुळ बुलढाणा ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपी अंमली पदार्थ विक्री करण्यात येणार असल्याची खबर मिळाल्यावर पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून केटीएम दुचाकी व मोबाईल हस्तगत करण्यात आला.

यातील अमीर हा खामगावला भंगारचा व्यवसाय करत होता. तर अतुलची त्याची तेथे ओळख झाली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, एस.डी.नरके यांच्या पथकाने केली आहे.

मुलांच्या भांडणातून महिलेवर वार

लहान मुलांच्या भांडणातून एकाच कुटूंबातील पाचजणांनी महिलेला बेदम मारहाण करीत तिच्यावर चाकूने वार करून जखमी केले. त्याशिवाय त्यांच्या रिक्षाची काच फोडून नुकसान करीत पतीला दमदाटी केली. ही घटना 31 डिसेंबरला येरवड्यातील यशवंतनगरमध्ये घडली अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

नागू भारस्कर, शिवाजी भारस्कर, सनी भारस्कर, सुरेश भारस्कर, मोहिनी भारस्कर (सर्व रा. यशवंतनगर, येरवडा ) यांच्याविूविर यांच्याविरूद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकिता भालेराव (वय 36 रा. यशवंतनगर, येरवडा) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी एकाच परिसरात राहायला आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांच्या लहान मुलांची भांडणे झाली होती. त्याच रागातून टोळक्याने महिलेला अडवून तिला मारहाण केली. तिच्यावर चाकूने वार करून जखमी केले. त्याशिवाय त्यांच्या रिक्षाची काच फोडून नुकसान केले. याप्रकरणी महिलेचा पती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना टोळक्याने दोघांना धमकावून शिवीगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...