आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपरफुटी प्रकरण:म्हाडा परीक्षा पेपरफुटीप्रकरणी हरकळ, देशमुखसह तिघांवर दोषारोपपत्र दाखल

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हाडाच्या अंतर्गत गट अ, ब, क पदांची परीक्षा घेण्यासाठी जीए सॉफ्टवेअर टेक्नाॅलॉजी प्रा. लि. कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, कंपनीचा संचालक डाॅ. प्रीतीश देशमुख याने एजंटच्या मदतीने परीक्षेपूर्वीच पेपर फाेडण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. सदर प्रकरणाचा पुणे सायबर पाेलिसांनी तपास करत डाॅ. प्रीतीश देशमुख (३२, मु.रा. वर्धा), एजंट अंकुश हरकळ (४४, रा. किनगावराजा, बुलडाणा), संताेष हरकळ (४२, रा. चिकलठाणा, आैरंगाबाद) या तिघांविरोधात बुधवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डाेलारे यांच्या न्यायालयात तीन हजार ५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात अाली आहे. या प्ररकणाचा तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...