आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना यश:छत्रपती संभाजीनगरचा सराईत चंदनचोर गजाआड

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या विविध भागातील चंदनाच्या झाडांची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी अटक केले आहे. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सद्दाम बेसमिल्हादू लोद (३४, रा. झेडपी शाळेजवळ, जंजाळा गाव, अंभई, ता.सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार फरार झाले. त्याच्या ताब्यातून पोत्यामधील दोन चंदनाच्या झाडांचे खोड जप्त करण्यात आले. आरोपीने शहरातील वानवडी, चतु:शृंगी, येरवडा, चंदननगर परिसरात चोरी केल्याचे कबूल केले.

बातम्या आणखी आहेत...