आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेत ब्ल्युटूथचा वापर:पुण्यात ठगास अटक, एमपीएससीच्या ' गट - क' परीक्षेचा मुख्य पेपर देत होता

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या 'गट क 'सेवा मुख्य परीक्षेत ब्ल्युटूथचा वापर करून प्रश्नपत्रिका सोडविणाऱ्या एका ठगास सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाईल, ब्ल्युटूथ जप्त करण्यात आले आहे. त्याला मदत करणारा साथीदार फरार झाला आहे. 6 ऑगस्ट रोजी नऱ्हेतील सिंहगड कॉलेज ऑफ आटर्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले.

संशयित हालचालींमुळे पकडले.

केवलसिंग चेनसिंग गुशिंगे (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. तो औरंगाबाद येथील गेवराई पैठण, होनोबाची वाडी येथील रहिवासी आहे. याप्रकरणी संतोष ताम्हाणे (वय ४५ रा. धायरी ,पुणे) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी (ता. ६ ) गट क सेवा मुख्य परिक्षा घेण्यात येत होती. त्यावेळी नऱ्हे परिक्षा केंद्रात केवलसिंग परिक्षा देत असताना पर्यवेक्षकाला त्याची संशयित हालचाल दिसून आली. संशय आल्यामुळे पर्यवेक्षकांनी त्याची तपासणी केली असता केवलसिंग ब्ल्यूटूथद्वारे प्रश्नपत्रिका सोडवित असल्याचे लक्षात आहे. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी त्याला मदत करणाऱ्या साथीदाराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक राहूल यादव याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

13 ऑगस्टपर्यंत कोठडी

सिंहगड पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी याबाबत सांगितले की, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या माध्यमातून कॉपी करण्यापूर्वी आरोपीच्या संशयित हालचालीवरून त्याला पकडले. कॉलेजने आम्हाला लागेच याबाबत माहिती कळवली. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्याला आम्ही अटक केली असून त्याला पुढील तपास होण्याच्या अनुषंगाने कोर्टात हजर करण्यात आले आहे. त्याला 13 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...