आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक करणाऱ्याचा दीड वर्षांनंतर केला खून:मंत्रालयात नोकरी, लोन मंजूर करून देण्याचे दाखवले होते आमिष

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्रालयात मेट्रो विभागासह लोन मंजूर करून देण्याच्या आमिषाने फसवणूक करणे एकाला जीवावर बेतली आहे. आरोपींनी दीड वर्षांनंतर संबंधिताचा शोध घेऊन बेदम मारहाण करत त्याचा खून केला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सदर खूनाची उकल करीत टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत अशी माहिती रविवारी दिली आहे.

सुनिल नलावडे (36) असे खून झालेल्याचे आहे. याप्रकरणी महेश शंकरराव धुमाळ (वय 32 रा. पिंपळे खालसा, हिवरे कुभार, पदमावती वस्ती, ता. शिरुर, पुणे) शिवराज किशोर प्रसाद सिंह (वय 32 रा. मोहितेवाडी, पोस्टा-वडगाव, ता-मावळ, पुणे )शिवाजी रंगाप्पा तुमाले (वय 56 रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे)अक्षय पोपट आढाव (वय 22 रा. सिरापुर, ता. पारनेर, जि. अहमदनगर ) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

मंत्रालयात नोकरीचे अमिष

सुनील नलावडेने ओळखीतील कुर्डेकर दाम्पत्याच्या मदतीने महेशला मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखविले होते. त्याशिवाय लोन मंजूर करण्यासाठी काही जणांकडून रक्कम उकळली होती. त्यानंतर दीड वर्षांपासून तो फरार झाला होता. तीन दिवसांपुर्वी सुनील हा वनिता कुर्डेकर हिच्या घरी आल्याची माहिती आरोपी महेश धुमाळ याला मिळाली. त्याने फसवणूक झालेल्या इतर साथीदारांना बोलावून सुनीलला नहऱ्यात जाउन बेदम मारहाण करून शनिवारी खून केला.

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट तीनने तळेगाव दाभाडे, फुरसुंगी,सिरापुर,ता.पारनेरमधून चौघांना ताब्यात घेतले. त्यांचा मोबाईल मोटार असा 5 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

यांनी पार पाडली कामगिरी

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) श्रीनिवास घाडगे, सहाय पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस उपनिरीक्षक, अजितकुमार पाटील, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, रामदास गोणते, सुजित पवार, संजीव कंळबे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...