आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा फुले जयंतीनिमित्त उपक्रम:पुण्यात फुलेवाड्यासमोर 5 हजार किलो मिसळ बनवली, शेफ विष्णू मनोहर यांनी केले मोफत वाटप

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून पुण्यात 5 हजार किलो मिसळ बनवण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी गंज पेठेतील फुलेवाड्यासमोर या मिसळीचे मोफत वाटप केले.

आज (मंगळवारी) पहाटे 3 पासून मिसळ करण्याकरिता तयारी सुरु झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी 6 वाजता भव्य अशा कढई मध्ये सर्व पदार्थ व मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर सकाळी 7 वाजता संपूर्ण मिसळ तयार झाली. महात्मा फुले वाडा येथे अभिवादनाकरता आलेल्या सर्व नागरिकांना मिसळ वाटप करण्यात आले.

तब्बल एवढे लागले साहित्य

या उपक्रमामध्ये 5 हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी 500 किलो, कांदा 300 किलो, आलं 100 किलो, लसूण 100 किलो, तेल 350 किलो, मिसळ मसाला 130 किलो, लाल मिरची पावडर 25 किलो, हळद पावडर 25 किलो, मीठ 20 किलो, खोबरा कीस 70 किलो, तमाल पत्र 5 किलो, फरसाण 1200 किलो, पाणी 4000 लिटर, कोथिंबीर 50 जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात आले.

आंबेडकर जयंतीलाही मिसळ

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्याकरिता 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 पासून पुणे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे 5 हजार किलो मिसळ तयार करण्यात येणार आहे. तसेच तेथे अभिवादनाकरिता येणाऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.