आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघ आयपीएलमध्ये फाफ डुप्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमविरुद्ध सलग पाचवा विजय संपादन करण्यासाठी सज्ज झाला आहे. चेन्नई आणि बंगळुरू संघ बुधवारी पुण्याच्या एमसीए मैदानावर समोरासमोर असतील. चेन्नई संघाने यंदाच्या सत्रामध्ये तीन सामने जिंकले आहेत. दुसरीकडे बंगळुरू टीमने पाच विजयाची नोंद केली आहे. आतापर्यंत चेन्नई आणि बंगळूरू संघांमध्ये ३० सामने झाले. यातील २० सामन्यांत चेन्नई संघाला विजयाची नोंद करता आली. फक्त नऊ सामन्यांत बंगळुरू टीमने विजय संपादन केला आहे. शेवटच्या पाच पैकी सलग चार सामन्यांत चेन्नईला विजयाची नोंद करता आली. त्यामुळे आता विजयाची ही मोहीम कायम ठेवण्याच्या इराद्याने चेन्नई संघ मैदानावर उतरणार आहे. बंगळुरू टीमने १० आॅक्टाेबर २०२० मध्ये चेन्नईविरुद्ध शेवटचा सामना जिंकला होता. बंगळुरू टीम आता सहाव्या विजयासह गुणतालिकेच्या टॉप-४ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी उत्सुक आहे.
चेन्नई सुपरकिंग्ज : बंगळुरूविरुद्ध फलंदाजी व गोलंदाजी अधिक मजबूत
जडेजाने नुकतेच चेन्नई संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघ विजयी माेहिमेसाठी सज्ज झाला आहे. यासाठी चेन्नई संघाला आता बंगळुरूविरुद्ध सर्वोत्तम अशी गोलंदाजी व फलंदाजी करावी लागणार आहे. बंगळुरूविरुद्ध सामन्यामध्ये चेन्नईची गोलंदाजी व फलंदाजी मजबूत मानली जाते. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबेने गत बंगळुरुविरुद्ध सामन्यात मोठी खेळी केली होती. तसेच सुरुवातीपासून फ्लाॅप ठरत असलेला ऋतुराज गायकवाडही या सामन्यात चमकला होता. गोलंदाजीत डॅ्वेन ब्राव्हो आणि मुकेश चाैधरी सध्या फॉर्मात आहेत. ब्राव्होने संघाकडून सर्वाधिक १४ बळी घेतले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: समन्वयातून मोठ्या खेळीची फलंदाजांकडून आशा
बंगळुरू संघाने पाच विजयांसह आगेकूच केली आहे. मात्र, आता टॉप-४ मधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी बंगळुरू संघाच्या फलंदाजांना मोठी खेळी करावी लागणार आहे. कर्णधार डुप्लेसिसला आपल्या जुन्या टीमविरुद्ध मोठी खेळी करावी लागणार आहे. त्याने दहा सामन्यांमध्ये आतापर्यंत २७८ धावा काढल्या आहेत. यासह तो संघाकडून टॉप स्कोअरर आहे. यामध्ये दिनेश कार्तिक २१८ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. गत सामन्यात कोहलीने मोठी खेळी केली होती. मात्र, टीमला पराभवाला सामोेरे जावे लागले. आता त्याच्याकडून टीमला पुन्हा मोठ्या खेळीची आशा आहे. गोलंदाजीत हसरंगा डिसिल्वा, जाेश हेझलवुड व हर्षलची कामगिरी काैतुकास्पद ठरलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.