आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:छगन भुजबळांनी हिंदू समाजाची माफी मागावी : मुळीक

पुणे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरस्वती देवीच्या प्रतिमा शाळेत कशासाठी? अशाप्रकारचे विधान करून नवरात्रीच्या पावन पर्वात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा भाजपच्या रोषाला सामोरे जावे, असा इशारा शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी बुधवारी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी मुळीक बोलत होते. मुळीक पुढे म्हणाले, सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते सैरभैर झाले आहेत. विकासकामांची कोणतीच दूरदृष्टी नसल्याने वैफल्यग्रस्त अवस्थेत ही मंडळी बेताल वक्तव्य करीत आहेत.