आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोपांच्या फैरी:मी हायवेवर पाहणी करून गेलो, असे दौरे केले नाही; छत्रपती संभाजी राजे यांची मुख्यमंत्र्यावर टीका

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांनी हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी, संभाजी राजेंची मागणी

मी आठवडाभर गावांमध्ये पायी फिरलो. चिखलात चालत गेलो. ट्रॅक्टरवर बसून गेलो. माझे दौरे ग्राउंडवर होते. पण मी हायवेवर पाहणी करून निघून गेलो, असे दौरे केले नाहीत, अशा शब्दांत राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.

या वेळी खासदार संभाजी राजे म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी मी दौरा केला आहे. तेथील परिस्थिती भयानक झाली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या असता. हेक्टरी ५० हजार रुपये सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी केली आहे. या मागण्याची सरकारने दखल घेतली पाहिजे. तसेच आपला पोशिंदा संकटात आहे. तो जगला पाहिजे. त्याला तात्काळ मदत झाली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्य मंत्रिमंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यानंतर केंद्राकडे निधी मागवा. सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील महापूर आला होता. तेथील नुकसान भरपाईचा अहवाल केंद्राकडे गेला नाही. त्यामुळे केंद्राने त्यावेळी मदत जाहीर करून देखील, केवळ राज्य सरकारने अहवाल पाठवली नाही. त्यामुळे अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. अशीच चूक या वेळी होता कामा नये, त्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. तसेच कोरोनामुळे आपली तिजोरी रिकामी झाली हे मान्य आहे. पण आपला पोशिंदा जगला पाहिजे. यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. शेतकरी प्रश्नांसाठी मी रिकामाच बसून असून या प्रश्नासाठी दिल्लीत आवाज उठविण्यास तयार आहे. राज्य सरकारने मला जबाबदारी द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी या वेळी केली.

राष्ट्रवादीच्या नेत्यामुळे मुंबै बँकेवर आरोप; प्रवीण दरेकरांची टीका

सांगली | पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या एका दिग्गज नेत्याच्या अहंकारामुळेच मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेविरोधात कथित आरोप करण्यात आले आहेत. परंतु या बँकेची कोणतीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

सांगलीतील भाजप नेते निशिकांत पाटील यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणि सहकारी साखर कारखान्याला मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज दिले असल्याचा राग धरुनच या मंत्र्यांनी बँकेवर कथित आरोप केले आहेत, असेही दरेकर यांनी या वेळी सांगितले.