आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंती 2022:किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह; उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेत्यांकडून शिवरायांना मानवंदना

जुन्नर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून, त्यानिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. किल्ले शिवनेरीवर देखील शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरीवर उत्साहाचे वातावरण असून, शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, शिवनेरीवरील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती लावली. यावेळी सर्वांना शिवरायांना मानवंदना दिली. ढोलताशांचा गजर आणि पोवाड्यांचा आवाज संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावर दुमदुमतोय. शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमध्ये देखील आज शिवजयंती साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील शिवरायांना अभिवादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांनी वंदन केले आहे. मोदींनी शिवाजी महाराज यांना वंदन करतानाचा एक फोटो देखील ट्विटवर पोस्ट केला आहे.

मोदींकडून अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे. सत्य आणि न्यायाच्या मूल्यांसाठी उभे राहण्याच्या बाबतीत ते ठाम होते. त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे म्हणत मोदींनी शिवरायांना वंदन केले आहेत. वंदन करताना मोदींनी एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यात मोदी शिवरायांना वंदन करताना दिसत आहे.

राहुल गांधीने केले वंदन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांनी वंदन केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, वीर, पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो. अहंकार आणि अन्यायाच्या विरुद्ध निडरता हेच सर्वात प्रभावी हत्यार आहे. असे म्हणत राहुल गांधी यांनी शिवरायांना नमन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...