आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Chief Minister Eknath Shinde's Instructions, Information Taken From Pune And Satara District Collectors Along With Chief Secretary

ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरवा:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली माहिती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

झाडे पडण्याच्या घटना

पुण्यात विमाननगर, सिंबायोसिस जवळ मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या मारुती सुझुकीच्या चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणली आहे. वीज पडून ही अग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तर गुरुवारी दिवसभरात पडणारया पावसामुळे अग्निशमन दलाकडे 8 झाडपडीच्या घटना नोंद झाल्या आहे.

वाहनांचे नुकसान

पुण्यातील सिहंगड रोड, माणिकबाग, सोमवार पेठ, शिवाजीनगर, मॉडल कॉलनी, येरवडा, नागपूर चाळ, शुक्रवार पेठ, चिंचेची तालिम,गोल्फ क्लब चौक, हडपसर, ससाणे नगर, ताडीवाला रोड, राजगुरू चौक याठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहे.तर दोन ठिकाणी चारचाकी वाहनांवर झाड पडून वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने जखमी कोणी नाही झाल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली आहे.

आणखी पाऊस अपेक्षित

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत आणखी पाऊस अपेक्षित आहे. यावेळचा पावसाचा पॅटर्न ठराविक मान्सूनच्या पॅटर्नसारखा नाही कारण तो दिवसाच्या उच्च तापमानाशी संबंधित आहे. वीज कडकडाटसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला जाऊ शकतो.

सावध राहण्याचा इशारा

येत्या काही दिवसांत मध्यम पाऊस वरची मर्यादा गाठू शकते (म्हणजे सुमारे 5 - 6 सें.मी. किंवा त्यापेक्षा किंचित जास्त, 1-2 दिवस). घाट परिसरात मुसळधार पावसाचा आधीच इशारा देण्यात आला असून पुढील दोन दिवसांत मुसळधार (मुसळधार) ते खूप मुसळधार (तुरळक ठिकणी जोरदर) पाऊस अपेक्षित आहे . विविध ठिकाणची धरणे जवळपास पूर्ण भरली आहेत त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यंत सावध राहावे असे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...